Sanju Samson: भारतीय दिग्गज खेळाडूने 'संजू सॅमसन'बाबत केले मोठे वक्तव्य! म्हणाला, " त्याच्याकडून निराशा झाली, संघातून काढण्यात आले.."

Sanju Samson comeback: संजू सॅमसनच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून निराशा झाली. संजू सॅमसनला संघातून काढून टाकण्यात आले.
Sanju Samson comeback
Sanju Samson comebackDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : केरळचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने वेस्ट इंडीज, इंग्लंड व न्यूझीलंड या देशांविरुद्धच्या सलग तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे नाबाद ९७ धावा, ८९ धावा, ८९ धावा फटकावत भारतीय संघाच्या टी-२० विश्‍वकरंडक विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला.

टी-२० विश्‍वकरंकाआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सपाटून अपयश आल्यानंतर टीम इंडियातून बाहेर काढण्यात आलेल्या या पठ्ठ्याने मालिकावीराचा मान संपादत झोकात पुनरागमन केले. संजू सॅमसनच्या धडाकेबाज कामगिरीबाबत भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कौतुक केले.

Sanju Samson comeback
IND vs NZ Final: अभिषेक शर्माचा धमाका! फायनलमध्ये 18 चेंडूत फिफ्टी ठोकून मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड; किवी गोलंदाजांची उडवली दाणादाण

सुनील गावसकर यांनी संजू सॅमसनच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून निराशा झाली. संजू सॅमसनला संघातून काढून टाकण्यात आले. टी-२० विश्‍वकरंडकात त्याला नामिबियाविरुद्धच्या लढतीत खेळण्याची संधी मिळाली.

Sanju Samson comeback
IND vs NZ Final: फायनलमध्ये अभिषेक-संजूचा 'विराट' अवतार! निर्भीड फटकेबाजीच्या जोरावर भारतीय सलामी जोडीनं मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड VIDEO

या लढतीत त्याला ठसा उमटवता आला नाही. यानंतर सुपर-८ फेरीतील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत त्याला संधी मिळाली, पण त्याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत नाबाद ९७ धावांची खेळी केली आणि येथून कलाटणी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com