Zambaulim Gulalotsav: जांबावली गुलालोत्सवासाठी 250 पोलीस तैनात! सुरक्षेचा पोलिस प्रशासनाकडून आढावा Watch Video

Zambaulim Gulalotsav 2026: जांबावलीच्या गुलालोत्ससाच्या सुरक्षा व्यवस्थेचा दक्षिण गोवा जिल्हा पोलिस प्रशासनाने सोमवारी आढावा घेतला.
Zambaulim Gulalotsav
Zambaulim GulalotsavDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जांबावलीच्या गुलालोत्सवच्या सुरक्षा व्यवस्थेचा दक्षिण गोवा जिल्हा पोलिस प्रशासनाने सोमवारी आढावा घेतला. या  महत्वाच्या  उत्सव सोहळ्यात  चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून, भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची संपूर्ण दक्षता घेतली गेली असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक संतोष देसाई यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

यावेळी श्री दामोदर देवस्थान समितीचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे हेही उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेसाठी  अडीचशे पोलिस तैनात केले असून, सकाळी दहा ते गुलालोत्सव संपेपर्यंत पोलिस लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती देसाई यांनी दिली.

Zambaulim Gulalotsav
Zambaulim Gulal Utsav: हरी रे रमणा! जांबावली परिसर न्हाला गुलाबी रंगात! श्री दामोदर देवाचा 'गुलालोत्सव' सोहळा जल्लोषात साजरा

सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी मेटल डिटेक्टर तसेच टेहळणी मनोराही सज्ज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.    सात ठिकाणी पार्किंग  सोय केली आहे. त्यातील क्रमांक एकच्या ठिकाणी लाला बाला घराच्या बाहेर चारचाकी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरुद्ध दुचाकीसाठी, मंदिराजवळ रिंग रोड येथे चारचाकी व दुचाकी पार्किंंग सोय केली आहे.

Zambaulim Gulalotsav
Mallikarjun Jatrotsav: श्री मल्लिकार्जुन देवाचा जयजयकार! पहा जत्रोत्सवाचे खास Photos

२२५ वाहतूक पोलिस तैनात

दक्षिण गोवा वाहतूक पोलिस अधीक्षक  राजेंद्र प्रभुदेसाई यांनी वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी २२५ वाहतूक पोलिस तैनात केले आहेत असे सांगितले. त्याशिवाय सेंट्रल पोलचे ८० पोलिसही असतील, असे सांगून पार्किंग व्यवस्थेबाबतही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com