Goa Budget: 'फुग्यात जसे हवेशिवाय काही नसते, तसे या अर्थसंकल्पात काही नाही'! सरदेसाईंचे टीकास्त्र Video

Vijai Sardesai Goa Budget: फुग्यात जसे हवेव्यतिरिक्त काही नसते, तसे या अर्थसंकल्पात काही नाही, अशी टीका फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली.
Vijai Sardesai Goa Budget
Vijai Sardesai Goa BudgetDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येत्या आर्थिक वर्षाचा विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा फुगा आहे. फुग्याप्रमाणे तो बाहेरून चांगला दिसतो, मात्र फुग्यात जसे हवे, व्यतिरिक्त काही नसते, तसे या अर्थसंकल्पात काही नाही, अशी टीका फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली.

ते म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न तब्बल एक लाख ५१ हजार रुपयांनी घटले आहे. याचा अर्थ सरकार जनतेचे दिवाळी काढण्यास निघाले आहे, असा होतो, अशी पोस्ट टीका करून ते म्हणाले, अर्थसंकल्पातील आकडेवारी आणि आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारी जुळत नाही. एकतर अर्थ खाते बरोबर असेल किंवा नियोजन सांख्यिकी खाते बरोबर असेल.

Vijai Sardesai Goa Budget
Goa Budget Session 2026: कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! 10 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी सरकारी नोकरीचा दर्जा; मुख्यमंत्र्यांची माहिती

सरकार आनंदाच्या निर्देशांकात गोवा वरच्या क्रमांकावर असल्याचा दावा करते, प्रत्यक्षात सरकारमधील आमदार मंत्री आणि त्यांचे दलाल हेच आनंदात आहेत. राज्य सकल उत्पादनाच्या पाच टक्के रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च करणे आदर्शवत असताना राज्यात केवळ १.६ टक्के रक्कमच आरोग्यासाठी खर्च केली जाते.

Vijai Sardesai Goa Budget
Goa Budget Highlights: करवाढ नाही, डिजिटल टॅक्सी धोरण, नोकऱ्या; गोव्याचा अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा थोडक्यात..

या साऱ्यामुळे बस्स आता सहन होत नाही,अशी जनभावना तयार झाल्याचे नमूद करून त्यांनी पुढील अर्थसंकल्प आमचे सरकार जनतेला दिलासा देणारा असा सादर करेल, अशी पुष्टी सरदेसाई यांनी जोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com