Trent Boult Dainik Gomantak
क्रीडा

Video: Trent Boult ने Steve Smith ला दिले वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट

पहिल्या दिवशी कसोटी सामन्यादरम्यान जिथे दिवसभर गोलंदाजांचा करिष्मा दाखवला, तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या डावात असे काही घडले, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगत आहे.

दैनिक गोमन्तक

लॉर्ड्सवर (Lords) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांनी मैदानावर आपल्या बॅटने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असं म्हणायल हरकत नाही. एकीकडे न्यूझीलंडने (New Zealand) पहिल्या डावात 132 धावा केल्या असताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या 7 विकेट 116 धावांवर पोहोचला. (Trent Boult gives Steve Smith a unique birthday present The video went viral)

दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी लॉर्ड्सच्या पीचवर धुमाकूळ घातला, त्यामुळेच पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. पहिल्या दिवशी कसोटी सामन्यादरम्यान जिथे दिवसभर गोलंदाजांचा करिष्मा पाहायला मिळाला, तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या डावात असे काही घडले, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगत आहे.

खरे तर न्यूझीलंडच्या डावात ट्रेंट बोल्ट (Trent Boult) फलंदाजी करत असताना अनेकवेळा त्याने अशी फलंदाजी केली की सगळ्यांना स्टीव्ह स्मिथच (Steve Smith) मैदानावर खेळत असल्याचे आठवले. असे झाले की, न्यूझीलंडच्या डावाच्या 36व्या ओव्हरमध्ये मॅथ्यू पॉट्स (Matty Potts) गोलंदाजी करत होता, त्यावेळी बोल्टमध्ये स्मिथची झलक दिसून आली. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बोल्ट स्मिथप्रमाणेच चेंडूचा बचाव करत होता.

यावर चाहते उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 जून रोजी स्टीव्ह स्मिथचा वाढदिवस देखील होता. अशावेळी बोल्टची बॅटिंग स्टाईल पाहून त्याने स्मिथला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे, अशी कमेंट देखील चाहत्यांनी दिली आहे. मीम्स शेअर करून चाहतेही हा व्हिडीओ खूप एन्जॉय करत आहेत.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या वेळी टेस्टमध्ये पदार्पण करून मॅथ्यू पॉट्स आणि अनुभवी जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्याने इंग्लंडने नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षक यांच्या नेतृत्वाखाली नवीन युगाची सुरुवात करत न्यूझीलंडला 132 धावांवर गारद केले. आधी इंग्लंडकडून (England) पदार्पण करणाऱ्या पॉट्सने 13 तर अँडरसनने 66 धावांत चार विकेट्स घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT