मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

UK Employee Compensation: कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा बॉससोबत होणारी थट्टा-मस्करी अनेकदा तणाव हलका करते, मात्र या मस्करीची सीमा ओलांडली तर काय होऊ शकते.
Racial Harassment Case
UK Employee CompensationDainik Gomantak
Published on
Updated on

Racial Harassment Case: कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा बॉससोबत होणारी थट्टा-मस्करी अनेकदा तणाव हलका करते, मात्र या मस्करीची सीमा ओलांडली तर काय होऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण ब्रिटनमधून समोर आले. एका आयरिश वंशाच्या महिला कर्मचाऱ्याला वारंवार "पोटॅटो" म्हणून चिडवणे एका कंपनीच्या बॉसला इतके महागात पडले की, आता त्या कंपनीला महिलेला 23,526 पाउंड म्हणजेच सुमारे 29 लाख रुपये इतकी मोठी नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वांशिक छळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु केली.

बर्नाडेट हेझ नावाच्या या महिलेने लीड्स येथील एका सिव्हिल इंजिनीअरिंग कंपनीत 'बुककीपिंग क्लर्क' म्हणून काम करताना हा मानसिक छळ सोसला. तिने न्यायालयासमोर दिलेल्या माहितीनुसार, तिचे बॉस मिक एटकिन्स हे तिला तिच्या आयरिश मुळावरुन वारंवार 'पोटॅटो' म्हणून चिडवायचे. खरं तर, आयर्लंडच्या इतिहासातील 'ग्रेट फॅमिन' (बटाट्याचा दुष्काळ) या वेदनादायी कालखंडाचा संदर्भ देऊन आयरिश लोकांना 'पोटॅटो' किंवा 'पॅडी' म्हणणे हे अत्यंत अपमानास्पद आणि वांशिक टिप्पणी मानले जाते. मिक एटकिन्स ऑफिसमध्ये येताच काहीही कारण नसताना महिलेकडे पाहून 'पोटॅटो' म्हणून ओरडायचे. इतर कर्मचाऱ्यांच्या समोर वारंवार होणाऱ्या या अपमानजनक वागणुकीमुळे बर्नाडेटला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

Racial Harassment Case
Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

बर्नाडेटने तिची व्यथा मांडताना सांगितले की, सलग सहा महिने सुरु असलेल्या या छळामुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता. ऑफिसला जाणे म्हणजे तिच्यासाठी एक शिक्षा झाली होती आणि तिथे तिला सतत असुरक्षित आणि अपमानित वाटायचे. आर्थिक गरजांमुळे ती नोकरी सोडू शकत नव्हती, ज्यामुळे तिला हा त्रास मुकाट्याने सहन करावा लागला. स्वतःची चूक नसतानाही केवळ मूळ देशावरुन होणारी ही टिप्पणी तिला मानसिकदृष्ट्या व्याकुळ करणारी होती.

Racial Harassment Case
Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

हे प्रकरण जेव्हा एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलमध्ये पोहोचले, तेव्हा न्यायाधीश बकले यांनी यावर अत्यंत कडक टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीला तिच्या वंशावरुन 'पोटॅटो', 'पॅडी' किंवा 'स्टुपिड पॅडी' असे संबोधणे हे स्पष्टपणे वांशिक भेदभावाचे लक्षण आहे. जरी बॉसने याला केवळ विनोद म्हटले असले, तरी त्यामुळे कामाच्या ठिकाणी एक शत्रुत्वपूर्ण आणि अपमानजनक वातावरण निर्माण झाले होते.

आयरिश वंशाच्या व्यक्तीसाठी असे शब्द वापरणे हे केवळ अयोग्य नसून ते कायद्याने गुन्हा आहे. याच आधारावर न्यायालयाने (Court) महिलेच्या बाजूने निकाल दिला आणि कंपनीला तिला 29 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. हा निकाल अशा सर्व लोकांसाठी एक धडा आहे जे 'मस्ती' आणि 'छळ' यातील पुसट रेषा ओळखण्यात चूक करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com