भारत-विंडीज मालिकेचे वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाही अमेरिकेत खेळणार

टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत.
Indian Cricket Team
Indian Cricket TeamTwitter/BCCI
Published on
Updated on

इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. या क्रिकेट मालिकेचे वेस्ट इंडिजने वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात भारताला तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. विशेष बाब म्हणजे यादरम्यान शेवटचे दोन टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत.

या दौऱ्याची सुरुवात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे 22 जुलै रोजी एकदिवसीय सामन्याने होईल. यानंतर उर्वरित दोन वनडे (24 आणि 27 जुलै) याच मैदानावर होतील. त्यानंतर पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. 29 जुलै रोजी पहिला T20 सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना वॉर्नर पार्कवर होणार आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे शेवटचे दोन T20 सामने खेळवले जातील.

Indian Cricket Team
दीपक-जया लग्नबंधनात अडकले, आग्रामध्ये घेतले सात फेरे, पाहा Photo

भारताच्या विंडीज दौऱ्याचे वेळापत्रक

  • 22 जुलै 1ली ODI, पोर्ट ऑफ स्पेन

  • 24 जुलै 2रा ODI, पोर्ट ऑफ स्पेन

  • 27 जुलै 3राODI, पोर्ट ऑफ स्पेन

(भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सर्व एकदिवसीय सामने खेळले जातील)

29 जुलै 1ली T20, पोर्ट ऑफ स्पेन

1 ऑगस्ट 2रा T20I, सेंट किट्स आणि नेव्हिस

2रा ऑगस्ट 3रा T20, सेंट किट्स आणि नेव्हिस

6 ऑगस्ट 4थी T20, फ्लोरिडा

7 ऑगस्ट 5वी T20, फ्लोरिडा

(सर्व T20 सामने रात्री 8 PM पासून)

Indian Cricket Team
टीम इंडियाला दिला होता मैदान सोडण्याचा सल्ला, रहाणेने सांगितली सिडनी कसोटी वादाची कहाणी

"आमचा युवा संघ ज्या प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे तेच प्रदर्शन दाखविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल," असे वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने आगामी मालिकेबद्दल सांगितले. भारताचा इंग्लंड दौरा 17 जुलैला संपणार आहे. त्या दौऱ्यात सहभागी खेळाडूंमधून ज्यांची निवड केली जाईल, ते थेट इंग्लंडहून वेस्ट इंडिजला रवाना होतील. भारत-विंडीज मालिका 'फॅनकोड' अॅपवर थेट प्रक्षेपित केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com