Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

Fatorda Police Action: गोव्यातील ड्रग्ज तस्करीच्या विरोधात पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून शनिवारी (14 मार्च) फातोर्डा पोलिसांनी एका तरुणाला अंमली पदार्थांसह अटक केली.
Fatorda Police Action
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील ड्रग्ज तस्करीच्या विरोधात पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून शनिवारी (14 मार्च) फातोर्डा पोलिसांनी एका तरुणाला अंमली पदार्थांसह अटक केली. मडगावमधील बोर्डा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 90 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) पोलिसांनी ही कारवाई केली असून मडगाव परिसरात यामुळे खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय तन्वीर मुल्ला हा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी बोर्डा येथील नागेश गार्डन परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती फातोर्डा पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. नागेश गार्डन परिसरात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या तन्वीरला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंमली पदार्थांचे पाकीट आढळले.

Fatorda Police Action
Goa Drugs Case: तपासणीला गेले अन् 'माल' घेऊन आले! कैद्यांचा गांजा तस्करीचा कट गोवा पोलिसांनी हाणून पाडला; 344 ग्रॅम गांजा जप्त

पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 900 ग्रॅम गांजा जप्त केला, ज्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य 90 हजार रुपयांच्या घरात आहे. फातोर्डा पोलिसांनी आरोपी तन्वीर मुल्ला याला तातडीने अटक करुन त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या कारवाईत अंमली पदार्थ जप्त झाल्याने यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Fatorda Police Action
Goa Drugs Case: 'गांजा' तस्करीचा प्रयत्न उधळला! आसामच्या तरूणाला सिकेरीतून बेड्या, कळंगुट पोलिसांची मोठी कामगिरी

पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास उपनिरीक्षक सचिन पाटील करत आहेत. हा गांजा नेमका कुठून आणला गेला होता आणि तो कोणाला विकला जाणार होता, या दिशेने पोलिसांची चौकशी सुरु आहे. पर्यटन हंगाम आणि स्थानिक महाविद्यालयीन तरुणांना लक्ष्य करण्यासाठी अशा प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे समोर येत आहे. फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com