US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

11 Indians Arrested in USA: अमेरिकेत स्थायिक होण्याचे आणि 'ग्रीन कार्ड' मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 11 भारतीय नागरिकांनी कायद्यालाच ठेंगा दाखवण्याचा प्रयत्न केला.
Fake Robbery Conspiracy Indians
11 Indians Arrested in USADainik Gomantak
Published on
Updated on

Fake Robbery Conspiracy Indians: अमेरिकेत स्थायिक होण्याचे आणि 'ग्रीन कार्ड' मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 11 भारतीय नागरिकांनी कायद्यालाच ठेंगा दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी या अजब कटाचा पर्दाफाश केला. या 11 जणांनी अमेरिकेत कायदेशीर वास्तव्य मिळावे यासाठी शॉर्टकट निवडला आणि विविध दुकानांमध्ये शस्त्रांच्या धाकावर बनावट दरोड्याचे नाटक रचले. या फसवणूक प्रकरणी आता या सर्व भारतीयांवर व्हिसा फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा उद्देश अत्यंत धक्कादायक होता. अमेरिकेच्या (America) नियमांनुसार, 'U व्हिसा' हा अशा परदेशी नागरिकांना दिला जातो जे एखाद्या गंभीर गुन्ह्याचे बळी ठरले आहेत किंवा ज्यांनी शारीरिक अथवा मानसिक छळ सोसला आहे. या व्हिसाच्या आधारे संबंधित व्यक्तीला अमेरिकेत कामाची परवानगी मिळते आणि पुढे 5 ते 10 वर्षांत ग्रीन कार्ड मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. याचाच फायदा घेण्यासाठी या आरोपींनी स्वतःला 'गुन्ह्याचा बळी' म्हणून सिद्ध करण्यासाठी बनावट दरोड्यांचा कट रचला. मार्च 2023 मध्ये 'रामभाई' नावाच्या एका मुख्य सूत्रधाराने ही संपूर्ण योजना आखली होती.

Fake Robbery Conspiracy Indians
America Iran Conflict: "हे युद्ध आपण का लढतोय हे खुद्द अमेरिकेलाही नीट कळलेले नाही"; ‘घाशीराम’ जागतिक सत्तापटलावरचे

या योजनेनुसार, मॅसॅच्युसेट्स आणि इतर राज्यांमधील मद्यविक्रीची दुकाने किंवा फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर बनावट दरोडा टाकला जाई. एक 'खोटा' दरोडेखोर शस्त्राचा धाक दाखवून कॅशियरला धमकावत असे आणि गल्ल्यातून पैसे घेऊन पसार व्हायचा. विशेष म्हणजे, तिथला क्लर्क (जो या कटाचा भाग होता) दरोडेखोर पळून गेल्यानंतर 5-10 मिनिटांनी मुद्दाम पोलिसांना (Police) फोन करुन तक्रार द्यायचा, जेणेकरुन ही घटना खरी वाटेल. तपासात असे समोर आले की, या बनावट पीडित क्लर्कांनी 'रामभाई'ला या योजनेत सामील होण्यासाठी पैसे दिले होते, तर रामभाईने दरोड्याचे नाटक करण्यासाठी दुकान मालकांना लाच दिली होती.

Fake Robbery Conspiracy Indians
America Missile: अमेरिकेने काढले भयानक 'मिसाईल', 30 मिनिटांत करणार भूभाग उध्वस्त; तुफान वेगाने करणार खात्मा

या प्रकरणी जितेंद्रकुमार पटेल, महेशकुमार पटेल, संजयकुमार पटेल, दीपिकाबेन पटेल, रमेशभाई पटेल, अमिताबेन पटेल, रौनककुमार पटेल, संगीताबेन पटेल, मिंकेश पटेल, सोनल पटेल आणि मितुल पटेल या 11 भारतीयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व मॅसॅच्युसेट्स, केंटकी आणि ओहियो या राज्यांमध्ये अवैधपणे राहत होते. यातील दीपिकाबेन पटेल हिला आधीच भारतात पाठवण्यात आले असून इतरांना विविध राज्यांतून अटक करण्यात आली.

Fake Robbery Conspiracy Indians
India America Trade War: "मोदींशी लवकरात लवकर बोला'', ट्रम्प यांना खासदारांचं पत्र, भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर'मध्ये आता डाळींचा पेच, कोण घेणार पुढाकार?

अमेरिकेच्या फेडरल कोर्टात या सर्वांना हजर केले जाणार असून व्हिसा फसवणुकीच्या या गुन्ह्यासाठी त्यांना 5 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि अडीच लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 2 कोटी रुपये) इतका दंड होऊ शकतो. यापूर्वीच दरोड्याचे नाटक करणारा 'दरोडेखोर' आणि त्याचा ड्रायव्हर यांना दोषी ठरवण्यात आले. भारतीयांच्या या 'जुगाड'मुळे अमेरिकेतील इमिग्रेशन कायद्यांचे काटेकोर पालन करणाऱ्या इतर प्रामाणिक भारतीयांच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com