Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

Saran Sexual Assault Case: बिहारमधील सारण जिल्ह्यातील डेरनी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली.
Bihar Crime News
Saran Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Bihar Crime News: बिहारमधील सारण जिल्ह्यातील डेरनी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली. एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर गावातीलच पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपींनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेच्या आईसमोरच तिला फरपटत नेऊन एका विहिरीत फेकून दिले, ज्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री घडली. पीडित विद्यार्थिनी घरात असताना गावातीलच पाच तरुण तिला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, मुलीचा आवाज ऐकून तिची आई तिला शोधत तिथे पोहोचली. आपल्या कृत्याचा उलगडा होईल या भीतीने आणि आईला समोर पाहून आरोपींनी मुलीला वाचवण्याऐवजी अधिक क्रूरता दाखवली. त्यांनी मुलीला सुमारे 10 मीटरपर्यंत फरपटत नेले आणि जिवंतपणीच गावातील एका खोल विहिरीत फेकून दिले. यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. विहिरीत पडल्यानंतर सुमारे 30 मिनिटे ती मुलगी मृत्यूशी झुंज देत होती, मात्र अखेर तिचा तडफडून मृत्यू झाला.

Bihar Crime News
Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

या घटनेचा एक प्रत्यक्षदर्शी समोर आला असून त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रत्यक्षदर्शीने यापूर्वीही एकदा पीडित मुलीला (Girl) मुख्य आरोपीच्या तावडीतून वाचवले होते. त्याच्या सांगण्यानुसार, मुख्य आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थिनीला त्रास देत होता आणि तिला सतत धमकावत होता. इतकेच नाही तर, या अघोरी कृत्यानंतर मुख्य आरोपीने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक धमकीवजा मेसेजही ठेवला होता, ज्यामध्ये त्याने घरात घुसून मारण्याची भाषा केली होती. यावरुन आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायद्याचा नसलेला धाक स्पष्टपणे दिसून येतो.

Bihar Crime News
Bihar Crime: धक्कादायक! प्रियकराने आधी प्रेयसीला दारु पाजली, नंतर तिच्या मुलांची हत्या करुन...

पीडित मुलीच्या आईने गावातीलच पाच तरुणांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा थेट आरोप केला. तिने सांगितले की, डोळ्यांदेखत आपल्या मुलीला विहिरीत फेकले जाताना पाहणे हे कोणत्याही आईसाठी सर्वात मोठे दुर्दैव आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. एका उच्चशिक्षित होऊ पाहणाऱ्या मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्यामुळे बिहारमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आता त्या व्हॉट्सॲप स्टेटसचा आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाचा आधार घेऊन तपास पुढे नेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Three detained in 17-year-old student murder case
Goa Police Inspector POCSO Case
verna police station Sexual Assault case
Patna Triple Talaq Court Judgment