Shakib Al Hasan
Shakib Al HasanDainik Gomantak

शाकिब अल हसन बनला बांगलादेशचा कसोटी कर्णधार, बंदीमुळे हिरावले होते कर्णधारपद!

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन (Shakib Al Hasan) पुन्हा एकदा संघाचा कसोटी कर्णधार बनला आहे.
Published on

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन पुन्हा एकदा संघाचा कसोटी कर्णधार बनला आहे. मोमिनुल हकच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा शाकिब अल हसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. शाकिब अल हसनवर बंदी घातल्यानंतर मोमिनुल हक कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. (Shakib Al Hasan has become the captain of the Bangladesh Test team for the second time)

दरम्यान, 2019 मध्ये शाकिबवर (Shakib Al Hasan) एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत, मोमिनुलला केवळ तीन कसोटी जिंकता आल्या, त्यापैकी एक विजय न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर आला. यासोबतच शाकिब अल हसन दुसऱ्यांदा कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे. शाकिबने 11 पैकी फक्त 3 कसोटी जिंकल्या आहेत. शाकिबला 2009 मध्ये कर्णधारपद मिळाले आणि त्यानंतर 2017 मध्ये तो पुन्हा कसोटी कर्णधार झाला.

Shakib Al Hasan
IPL 2022 Auction: शाकिब अल हसनने इतिहास रचून फ्रँचायझींना केलं आकर्षित

तसेच, यावर्षी सर्वोत्तम फलंदाजी करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासचाही गौरव करण्यात आला आहे. लिटन दासला बांगलादेशचा कसोटी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. लिटन दास सध्या कसोटी क्रमवारीत 12व्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या फलंदाजाला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) एवढे मोठे मानांकन गाठता आले आहे. तो या वर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com