Pat Cummins | Travis Head X/cricketcomau
क्रीडा

Australia Test Team: वर्ल्डकप विजयाच्या हिरोला ऑस्ट्रेलियाकडून बक्षिस! स्मिथसह हेडला दिली महत्त्वाची जबाबदारी

Australia vs Pakistan: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांची प्लेइंग इलेव्हन घोषित करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Australia vs Pakistan, 1st Test at Perth, Playing XI:

पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्यात 14 डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असणार आहे.

पहिला सामना पर्थला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

ट्रेविस हेडकडे मोठी जबाबदारी

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे तो स्टिव्ह स्मिथसह हे पद सांभाळेल. स्मिथ देखील ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. स्मिथ आणि हेड मिळून कर्णधार पॅट कमिन्सला सहकार्य करताना दिसतील.

हेडने नुकतेच नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला 2023 वर्ल्डकप स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तो उपांत्य आणि अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला होता.

नॅथन लायनचं पुनरागमन

ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनचेही पुनरागमन झाले आहे. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्येही समावेळ करण्यात आला आहे. तो गेल्या काही दिवस दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल झालेला नाही.

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श यांच्यासह वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत.

पाकिस्तानकडून दोघांचे पदार्पण

पाकिस्ताननेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या मालिकेत शान मसूद पहिल्यांदाच पाकिस्तानचे कसोटीत नेतृत्व करताना दिसेल. तसेच पाकिस्तानने अष्टपैलू अमीर जमाल आणि वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्यामुळे हे दोघेही पर्थमध्ये कसोटी पदार्पण करताना दिसतील.

याशिवाय पाकिस्तान संघात इमाम-उल-हक, बाबर आझम, अब्दुल्ला शफिक, यष्टीरक्षक सर्फराज अहमद, सलमान अली आघा हे संघात आहेत, तर शाहिन आफ्रिदी, फहिम अश्रफ हे गोलंदाजही प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत.

पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

  • ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, जोश हेजलवूड.

  • पाकिस्तान : इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफिक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकिल, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली अघा, फहिम अश्रफ, शाहिन आफ्रिदी, अमीर जमाल आणि खुर्रम शहजाद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT