World Cup 2023: 'रोहित सर्वात दुर्दैवी व्यक्ती...' वर्ल्डकप विजयानंतर ट्रेविस हेड झाला व्यक्त

Travis Head on Rohit Sharma: भारताविरुद्ध वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या फायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या ट्रेविस हेडने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Travis Head | India vs Australia | World Cup 2023 Final
Travis Head | India vs Australia | World Cup 2023 Final

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Travis Head:

रविवारी (19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात ट्रेविस हेडने मोलाचा वाटा उचलला. त्याने आधी क्षेत्ररक्षणात कमाल दाखवली आणि रोहित शर्माचा मागे पळत जाऊन अफलातून झेल घेतला. त्याने घेतलेल्या या झेलानंतर भारताची धावगती मंदावली आणि भारताला 240 धावाच करता आल्या. तसेच गोलंदाजीतही त्याने 2 षटकात अवघे 4 धावा दिल्या.

तसेच नंतर फलंदाजी करताना शतकी खेळी केली. त्याने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकार खेचत 137 धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Travis Head | India vs Australia | World Cup 2023 Final
World Cup 2023: अंतिम सामन्यात नक्की चुकलं कुठे? भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या 'या' 4 गोष्टी

दरम्यान, सामन्यानंतर हेडला रोहितच्या घेतलेल्या झेलाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी हेड म्हणाला, 'कदाचीत रोहित शर्मा सध्या जगातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती असेल. क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे, ज्यावर मी मेहनत घेतली होती. मी शतक करेल, याची कल्पनाही केली नव्हती आणि तो झेल घेईल, हा विचारही केला नव्हता. तो झेल घेणे आनंददायी आहे.'

दरम्यान, भारताने दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एका क्षणी 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी 192 धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ पोहचवले. लॅब्युशेनने 58 धावांची नाबाद खेळी केली.

Travis Head | India vs Australia | World Cup 2023 Final
World Cup 2023: 'निकाल आमच्या बाजूने लागला नाही, पण...', भारताच्या पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

याबद्दल हेड म्हणाला, 'मी याची अपेक्षा केली नव्हती. हा अविश्वसनीय दिवस आहे. घरी काऊचवर बसण्यापेक्षा हे जास्त भारी आहे. योगदान देऊन चांगले वाटत आहे. मी खेळलेल्या पहिल्या 20 चेंडूंनी मला खूप आत्मविश्वास दिला, तो माझ्या खेळीदरम्यान कायम राहिला.

'मिचेल मार्श फलंदाजीला आल्यानंतर त्याने ज्याप्रकारे सुरुवात केली होकी, त्याने सामन्याला दृष्टीकोन दिला. तीच उर्जा आम्हाला हवी होती. कारण आम्हाला माहित होते की कदाचीत खेळपट्टी कठीण असू शकते.'

'नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय चांगला होता. जसजसा दिवस पुढे गेला, तशी खेळपट्टी चांगली होत गेली. खेळपट्टी थोडी फिरकीला मदतगार होती. वर्ल्डकप विजयाचा भाग होऊन आणि त्यात भूमिका बजावून चांगले वाटत आहे.'

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. तसेच मिचेल मार्शबद्दल सांगायचे झाले, तर त्याने एक चौकार आणि एक षटकार मारत चांगली सुरुवात केली होती. त्याने 15 चेंडूत 15 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com