भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत 4-3 असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले. Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: हॉकीत महिला चंदेरी पदकापासून वंचित, स्पर्धेतील कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक

स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपली छाप सोडली आहे. भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत 4-3 असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिंपिकमध्ये हॉकीत भारतीय महिलांनी (Indian women in hockey) पुन्हा एकदा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत चांगली फाईट केली. परंतु ग्रेट ब्रिटनने भारताचा 4-3 असा पराभव करत चंदेरी पदकापासून दूर ठेवले आणि भारताचे स्वप्न भंगले. स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपली छाप सोडली आहे. भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत 4-3 असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले.

या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. पण दुसरा 15 मिनिटांचा क्वार्टर नाट्यमय झाला ग्रेट ब्रिटने आक्रमक खेळ करत 16 व्या मिनिटात पहिला गोल केला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर याच क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने ही आघाडी मजबूत करत 2-0 अशी केली. पण भारतीय महिलांनी जबरदस्त कमबॅक केले. यात गुरजीत कौरने भारताला पुन्हा सामन्यात आणले. त्यानंतर एका मिनिटांच्या अंतराने भारताला बॅक टू बॅक दोन पेनॉल्टी कॉर्नर मिळाले त्यातील एक कॉर्नर गोलमध्ये परावर्तीत केला. या गोलनंतर भारताचे मनोबल इतके वाढले की गुरजीत कौरने पुन्हा आपला जलवा दाखवत आणखीन एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय महिलांच्या ताळमेळ इतका चांगला झाला की याच क्वार्टरच्या समाप्तीला वंदना कटारियाने आणखीन एक गोल करत 2-0 ने मागे आसलेल्या भारताने 3-2 अशी आघाडी घेत धडाक्यात सामन्यात वापसी केली. हाफ टाईम पर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवत पुरुषां प्रमाणेच महिलांनी खेळ केला. भारतीय लेकींच्या या खेळीमुळे भारतीय फॅन्सच्या मनात पदाकाची आशा आणखीन घट्ट झाली.

तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला ग्रेट ब्रिटला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतू भारताचा डिफेन्स सतर्क होता आणि त्यांनी हा पेनल्टी कॉर्नर वाचविला. परंतु ग्रेट ब्रिटनने तिसऱ्या हाफमध्ये भारतावर गोल करत पुन्हा 3-3 अशी बरोबरी साधली. या क्वार्टन ग्रेट ब्रिटनच्या पारड्या गेला या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनला अनेक संधी मिळाल्या परंतु भारतीय संघाने आणि गोलकिपर सविता पुनियाने त्याला गोलमध्ये परावर्तीत होऊ दिले नाही. तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटाला भारतीय संघाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यात त्यांनी चांगला प्रसत्न केला पण हा प्रयत्न गोल भारताला गोल देऊ शकला नाही. तिसरा क्वार्टरमध्ये 3-3 असा स्कोर होता.

चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टमध्ये सुरुवातीच्या तिन मिनीटांमध्ये ग्रेट ब्रिटनला सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील चौथ्य पेनल्टी कॉर्नरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या वॉलसनने त्याला गोलमध्ये परावर्तीत केले आणि 4-3 आशी ग्रेट ब्रिटनने आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम ठेवत भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत 4-3 असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT