Tokyo Olympics: कुस्तीत रवी कुमारला रौप्य पदक, तर दीपकचा पराभव

57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइलमध्ये अंतिम सामन्यात झाव्हूर रविपेक्षा भारी ठरला. आणि 4-7 अशा फरकाने सामना जिंकत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइलमध्ये अंतिम सामन्यात झाव्हूर रविपेक्षा भारी ठरला.
57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइलमध्ये अंतिम सामन्यात झाव्हूर रविपेक्षा भारी ठरला. Dainik Gomantak

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचा पहिलवान रवि कुमार (Indian wrestler Ravi Kumar) याचा रशियाचा वर्ल्ड चॅम्पियन झाव्हूर उगुएव याने (Zavur Uguev) पराभव करत भारताचे टोकियो ऑलिंपिकमधील पहिले सुवर्ण पदकाचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइलमध्ये अंतिम सामन्यात झाव्हूर रविपेक्षा भारी ठरला. आणि 4-7 अशा फरकाने सामना जिंकत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइलमध्ये अंतिम सामन्यात झाव्हूर रविपेक्षा भारी ठरला.
Tokyo Olympics: 41 वर्षांनंतर सुवर्णक्षण, भारताला हॉकीत ब्रॉंझ

पहिल्या हाफमध्ये झाव्हूर 4-2 असा पुढे होता. त्यानंतरच्या शेवटच्या 3 मिनीटामध्ये झाव्हूरने आणखीन एक पॉईंट मिळवत भारताचे सुवर्ण पदकाचे लांब जाताना दिसू लागले. शेवटचा 1 मिनिट बाकी असताना झाव्हूरने डाव टाकत आखीन 2 गुणांची कमाई केली. त्यानंतर रविने देखील डाव टाकला परंतु त्याला दोन गुण मिळाले. आणि 4-7 ने झाव्हूरने सामना जिंकला रविला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

रवि कुमारने सेमीफाइनमध्ये कजाखस्तानच्या नूरइस्लाम सानायेवला 7-9 असे हरविले. त्याआधी क्वार्टर फाइनल मध्ये बुल्गारियाच्या जॉर्जी वैलेंटिनोवला 14-4 असा सहज विजय मिळविला. आणि त्याआधी रविने कोलंबियाच्या के ऑस्कर एडुआर्डो टाइग्रेरोस उरबानाचा 13-2 अशी पराभवाची धूळ चारली.

86 किलो वजनी गटात दीपकचा पराभव

त्याआधी 86 किलो वजनी गटात दीपक पूनियाचा सॅनमारीनोच्या माइल्स एमिने शेवटच्या 15 सेकंदात डाव टाकत पराभव करत कांस्य पदक पटकाविले आहे. दीपकने या सामन्यात चांगली कामगिरी केली पण शेवटच्या सेकंदात त्याला डिफेन्ड करता आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com