Tokyo Olympics: सुवर्ण पदाचे स्वप्न स्वप्नच राहिले, भारताच्या लेकी हारल्या तरी त्या लढल्या

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian women's hockey team) अर्जेंटीनाने (Argentina) 2-1 ने असा पराभव करत भारताच्या सुवर्ण पदकाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे
Tokyo Olympics: Indian women's hockey team during a game against Argentina
Tokyo Olympics: Indian women's hockey team during a game against Argentina
Published on
Updated on

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian women's hockey team) अर्जेंटीनाने (Argentina) 2-1 ने असा पराभव करत भारताच्या सुवर्ण पदकाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारतीय महिलांनी चांगली फाईट केली. परंतु त्या भारताचा पराभव टाळू शकल्या नाहीत. या पराभवामुळे भारताच्या सुवर्ण पदाकाच्या स्वप्न भंगले असले तरी अद्याप ब्राँझ पदकाची आशा कायम आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताकडून गुरजीत कौर हिने 2 मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताचे खाते उघडले. अर्जेंटीनाला देखील 7 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. परंतु तो वाया गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारत 1-0 ने पुढे होता. येथूनच सर्वांच्या आशा पल्लवीत होण्यास सुरुवात झाली.

दुसऱ्या क्वार्टरचा खेळ सुरु त्याच्या पहिल्या काही मिनिटांतच अर्जेंटीनाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु तो वाया गेला. पण 17 व्या मिनिटाला पुन्हा एका पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटीनाच्या नोवेल बरीओनिव्हो हिने गोल करत बरोबरी केली. आणि भारताच्या चिंतेत पुन्हा भर पडली. दुसरा क्वार्टर संपत असताना भारताला एका मिनिटांच्या अंतराने दोन सलग पेनल्टी कॉर्नस् मिळाले परंतु भारताने आघाडी मिळविण्याची संधी गमाविली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना समान संधी मिळाल्या परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर दोघांनाही करता आले नाही. हाफ टाईममध्ये दोन्ही संघाचा स्कोर 1-1 असाच होता.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले त्यातील दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटीनाची कर्णधार मारिया नोएल गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. या गोलमुळे भारतीय कोट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि सुवर्ण पदक दूर झाल्या सारखे दिसू लागले.

चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाकडून खूप अपेक्षा होत्या, या क्वार्टरच्या 10 मिनटे राहिली असताना भारताने एक संधी निर्माण केली परंतु त्याला गोलमध्ये परार्वर्तीत करण्यास भारताला यश आले नाही. त्यानंतर लगेचच एक पेनल्टी कॉर्नरवर पुन्हा संधी आली पण त्यातही गोल झाला नाही. या क्वार्टरमध्ये भारतीय महिलांनी संधी निर्माण केल्या पण त्यांना त्या गोलमध्ये परावर्तीत करता आल्या नाहीत. तरी या सामन्यात भारताच्या लेकी जरी हरल्या असल्या तरी त्या लढल्या आणि सर्व भारतीयांची मने जिंकली.

कुस्तीत भारताचे पदक पक्के

भारताचा पहिलवान रवि दाहिया याने जबरदस्त सुरुवात करत भारताचे पदक पक्के केले आहे. रविने 57 किलो वजनी गटात तांत्रिकतेच्या आधारावर कझाकिस्तानच्या के नूरइस्लाम सुनयव याचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे कुस्तीमध्ये देखील सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 2-9 अशा पिछाडीवर असलेल्या रविने शेवटच्या मिनिटांमध्ये आक्रमक खेळ केला. 5-9 असा स्कोर असताना जॉर्जीला दुखापत झाली. त्याचा फायदा रविने घेत आणखीन एक डाव टाकत अजून 2 अंक मिळविले. शेवटची 45 मिनिटे राहिली असताना रविने पुन्हा एकदा चितपट करण्याच्या प्रयत्नात असताना तांत्रिकतेच्या आधारावर रविला विजयी घोषीत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com