Sushil Kumar Dainik Gomantak
क्रीडा

Sagar Dhankar Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमारचा न्यायालयाने जामीन केला मंजूर

Sushil Kumar Granted Bail: कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला कुस्तीपटू सुशील कुमार याला जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Sushil Kumar Granted Bail: कुस्तीपटू सागर धनखरच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला कुस्तीपटू सुशील कुमार याला जामीन मिळाला आहे. ऑलिम्पियन सुशील कुमारला 12 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला 13 नोव्हेंबर रोजी कारागृहात आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

दरम्यान, पत्नीच्या आजारपणाचे कारण देत जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. रोहिणी न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशील कुमारला जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर सागरचे कुटुंबीय सुशीलच्या जामिनाला विरोध करत होते. जामिनाविरोधात सागरचे कुटुंबीय न्यायालयात जाणार आहे.

दुसऱ्या आरोपीला पॅरोल

यापूर्वी, न्यायालयाने या खून प्रकरणातील एका आरोपीला परीक्षेला बसण्यासाठी कोठडीत पॅरोल मंजूर केला होता. आरोपी गौरव लाउरा याने 5 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबर रोजी परीक्षेला बसण्यासाठी कोठडीत जामीन किंवा पॅरोल मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपीला 5 नोव्हेंबर 2022 आणि 9 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 ते 6 या वेळेत परीक्षेला बसण्यासाठी कोठडीत पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

न्यायाधीशांनी सांगितले की, 'आरोपी हा बारावीचा विद्यार्थी आहे. त्याला यापूर्वीही परीक्षेसाठी पॅरोल मंजूर झाला होता.' न्यायालयाने पुढे सांगितले की, 'संबंधित खर्चासाठी आरोपींना 20,000 रुपये तुरुंग प्रशासनाकडे जमा करावे लागतील आणि उर्वरित रक्कम सरकारकडून घेतली जाईल.'

दुसरीकडे, पूर्व ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखर याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी गौरव लाउरा, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) आणि अन्य 15 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार आरोप निश्चित केले होते. खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर कामात सहभाग अशा गुन्ह्यांसाठी न्यायालयाने आरोप निश्चित केले. न्यायालयाने दोन फरार आरोपींवरही (Accused) आरोप निश्चित केले आहेत.

शिवाय, 4 मे 2021 रोजी सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सागरचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. घटनेपासून सुशील फरार होता. नंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने अटक केली. या प्रकरणाचा सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून तपास केला जात होता. नंतर तो दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

Rashi Bhavishya 26 August 2025: मनातील गोंधळ कमी होईल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल; वाचा तुमच्या राशीचं भविष्य

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT