T20 World Cup: या खेळाडूने अचानक सोडले संघाचे कर्णधारपद, चाहत्यांना मोठा धक्का

Mohammad Nabi: टी-20 विश्वचषक अतिशय शानदार पद्धतीने खेळवला जात आहे.
Mohammad Nabi
Mohammad NabiDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammad Nabi: टी-20 विश्वचषक अतिशय शानदार पद्धतीने खेळवला जात आहे, मात्र याच दरम्यान अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अफगाणिस्तानकडून खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे. टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानला चांगली कामगिरी करता आली नाही.

दरम्यान, मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आमचा T20 वर्ल्ड कपचा प्रवास संपला आहे. आम्हाला मिळालेल्या निकालाची आम्हाला किंवा आमच्या चाहत्यांनाही अपेक्षा नव्हती. सामन्यांच्या निकालाने तुम्ही जितके निराश आहात तितकेच आम्हीही निराश आहोत.'

Mohammad Nabi
T20 World Cup 2022 : 'या' खेळाडूच्या फलंदाजीमुळे वाढवली बाबर-रिझवानची चिंता; सेहवागने दिला इशारा

नबीने पुढे लिहिले की, 'गेल्या एक वर्षापासून आमच्या संघाची तयारी एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधार हवा असेल किंवा आवश्यक असेल त्या पातळीवर नव्हती. तसेच गेल्या काही दौऱ्यांमध्ये संघ व्यवस्थापन, निवड समिती हे एका पेजवर नव्हते, त्यामुळे संघाच्या संतुलनावर परिणाम झाला. त्यामुळे, मी कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा करत आहे. जेव्हा व्यवस्थापन आणि संघाला माझी आवश्यकता असेल तेव्हा मी माझ्या देशासाठी खेळत राहीन.'

तसेच, हा टी-20 विश्वचषक अफगाणिस्तानसाठी (Afghanistan) खूपच निराशाजनक राहीला. सुपर-12 मध्ये थेट पात्र ठरलेल्या या संघाचे दोन सामने पावसामुळे वाहून गेले, तर 3 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या विश्वचषकात अफगाणिस्तान हा एकमेव संघ आहे, जो एकही सामना जिंकू शकला नाही.

Mohammad Nabi
T20 World Cup: चाहत्यांसाठी मोठी बातमी, सेमीफायनल अन् Final मॅचसाठी ICC ने घेतला हा निर्णय

तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, गतविजेत्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 54 धावांचे अर्धशतक झळकावले. त्यांच्याशिवाय मिचेल मार्शने 45, वॉर्नर आणि स्टॉइनिसने प्रत्येकी 25 धावा केल्या. दुसरीकडे अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने तीन बळी घेतले.

Mohammad Nabi
T20 World Cup: उपांत्य फेरीत टीम इंडिया कुणाशी दोन हात करणार, बदलली समीकरणे

शिवाय, नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला 106 धावांआधीच रोखायचे होते, पण कांगारु संघाला त्यात अपयश आले. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 षटकांत 7 गडी गमावून 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेवटी रशीद खानने 23 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 48 धावांची तुफानी खेळी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com