युवा कुस्तीपटूच्या खून प्रकरणात ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमार फरार!

Olympic champion Sushil Kumar absconding in murder case of young wrestler
Olympic champion Sushil Kumar absconding in murder case of young wrestler

खुनाच्या प्रकरणामुळे ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) चांगलाच अडचणीत सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सुशील कुमारच्या विरोधात लूक आऊट नोटीस बजावली आहे. छत्रसाल मैदानावर झालेल्या भांडणामुळे कुस्तीपटू सागर राणाचा (Sagar Rana) जागीच मृत्यू झाला. याप्रकरणामुळे सुशील कुमारच्या घरावर अलीकडेच छापा टाकला होता. परंतु सुशील कुमार यातून फरार झाला. सुशील कुमारशिवाय त्याच्या इतर 20 साथीदारांचा पोलिस तपास करत आहेत. (Olympic champion Sushil Kumar absconding in murder case of young wrestler)

सुशील कुमारसह इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिस दिल्ली एनसीआर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये छापा टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मॉडेल टाऊन परिसरातील प्लॅट रिकामा करण्यासाठी हा वाद सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलालला सुरुवातीच्या वेळी अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याचे अन्य साथीदार या भांडणामध्ये सहभागी होते. यांच्यातील वाद 4  मे रोजी झाला होता. त्यांच्या भांडणामध्ये दोघेही जखमी झाले होते. सागरला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी सागरचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

या घटनेप्रकरणी पोलिस कॅमेरा फुटेजद्वारा संबंधित व्यक्तींचा तपास करत आहेत. त्यामुळे काहींची ओळख पटवण्यात आली आहे. ज्या लोकांची नावे समोर आली आहेत त्यांचं लोकेशन पोलिस शोधत आहेत. माझा या घटनाप्रकरणाशी काही एक संबंध नाही. आमच्या कुस्तीपटूंचा या भांडणात सामील नव्हते. आम्ही पोलिसांना कळवलं आहे की, काही अज्ञतांनी उडी मारुन हे भांडण केले, असे सुशील कुमारने घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सांगितले होते. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com