Sri Lanka Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SL: भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा

24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या संघासाठी श्रीलंकेने 18 सदस्यीय संघाची (Sri Lanka T20I team) घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंका (IND VS SL) ने भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या संघासाठी श्रीलंकेने 18 सदस्यीय संघाची (Sri Lanka T20I team) घोषणा केली आहे. भारताचा सामना करण्यासाठी श्रीलंकेने (Sri Lanka) सर्वोत्तम संघ निवडला आहे. संघाची कमान दासुन शनाकाकडे असणार आहे, तर चरित असलंका (Charit Aslanka) उपकर्णधार असणार आहे. त्याचबरोबर संघात चंडिमल, वनेंदू हसरंगासारखे (Wanindu Hasaranga) अनुभवी खेळाडू आहेत. (Sri Lanka Has Announced Its Squad For The T20 Series Against India)

आयपीएल लिलाव 2022 (IPL 2022) मध्ये हसरंगाला 10.75 कोटी इतकी मोठी रक्कम मिळाली असून अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर आहेत. याशिवाय मिस्ट्री स्पिनर महिष तेक्षनालाही संघात संधी मिळाली आहे, ज्याच्यावर चेन्नई सुपर किंग्जने मोठी बोली लावली होती. याशिवाय दुष्मंता चमिरा हा देखील श्रीलंकेच्या संघाचा एक भाग आहे.

T20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ – दासून शनाका, चरित असलंका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, धनुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा, जानाथ लियानागे, वानेंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुष्मंता फरनानंद फेर्नांदो, फेर्नानंद फेर्नांदो, फर्नांदो कुमारा , जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रम, आशियान डॅनियल्स.

दरम्यान, श्रीलंकेचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर गेला होता, जिथे त्यांना टी-20 मालिकेत 1-4 असा मोठा पराभव पत्करावा लागला होता. संघाने पहिले चार सामने गमावले आणि शेवटचा सामना पहिल्या एका चेंडूवर 5 विकेटने जिंकला. श्रीलंकेने मालिका गमावली असली तरी ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला कडवी टक्कर दिली होती. विशेषत: कुसल मेंडिसने 50 च्या सरासरीने 100 धावा केल्या. तर दुसरीकडे निसांकाने 26.80 च्या सरासरीने सर्वाधिक 184 धावा केल्या. शनाकानेही फलंदाजीत शानदार कामगिरी केली. तर गोलंदाजीत महिष तेक्षनाने 5 बळी घेतले. दुष्मंता चमीराने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या. वनेंदू हसरंगाने 2 सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या.

भारताचा श्रीलंका दौरा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे. 24 फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशालामध्ये टी-20 सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरुमध्ये होणार आहे.

श्रीलंका टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि आवेश खान.

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT