कुणाल पांड्या (Kunal Pandya) याच्यानंतर टीम इंडियाचे आणखीन दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
कुणाल पांड्या (Kunal Pandya) याच्यानंतर टीम इंडियाचे आणखीन दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. Dainik Gomantak

IND vs SL: कुणाल पांड्यानंतर आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

भारतीय संघाचा (Indian team) खेळाडू कुणाल पांड्या पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली. याचा फटका भारतीय संघाला बसला असून भारतीय संघाने टी-20 मालिका गमाविली आहे.
Published on

श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मागे लागलेले कोरोनाचे (Covid19) शुल्ककाष्ट काही सुटताना दिसत नाही. ऑलराउंडर कुणाल पांड्या (Kunal Pandya) याच्या नंतर आता स्पिनर यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gautam) यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. हे दोघेही सध्या विलगीकरणात आहेत. हे दोघे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या कुणाल पांड्याच्या संपर्कात आले होते.

यजुवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम यांच्या शिवाय पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, दीपक चहर, आणि ईशांत किशन हे देखील संपर्कात आले होते.

कुणाल पांड्या (Kunal Pandya) याच्यानंतर टीम इंडियाचे आणखीन दोन खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
IND vs SL: पांड्याच्या संपर्कात आलेले संघाचे 9 खेळाडू पुढील सामन्यांना मुकणार

IND vs SL टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले, वनडे मालिका टीम इंडियाने आपल्या नावावर केली. टी-20 मध्ये देखील भारतीय संघ 1-0 असा पुढे होता. परंतु दुसऱ्या सामन्याच्यावेळी भारतीय संघाचा खेळाडू कुणाल पांड्या पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली. याचा फटका भारतीय संघाला बसला असून भारतीय संघाने टी-20 मालिका गमाविली आहे. आता कुणालच्या संपर्कात आलेले कृष्णप्पा गौतम आणि यजुवेंद्र चहल यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com