IND vs SL यांच्यातील टी-20 (T-20) सामना आज होणार आहे. काल होणार हा सामना भारतीय संघाचा (Indian team) खेळाडू कुणाल पांड्या याची कोरोना (Covid19) चाचणी पॉझिटीव्ह आल्याने पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आज हा दुसरा टी-20 खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात कुणाल पांड्यासह त्याच्या संपर्कात आलेले भारतीय संघाचे 9 खेळाडू मालिकेच्या बाहेर झाले आहेत. यात एक समाधानाची गोष्ट म्हणजे कुणाल पांड्या सोडून बाकीच्या 8 खेळाडूंची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि श्रीलंका यांच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. या मालिकेती दुसरा सामना काल 27 जुलैला आणि तिसरा सामना 29 जुलैला होणार होता. परंतु काल भारतीय संघाचा खेळाडू कुणाल पांड्या याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने कालचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. आता हा सामना आज (28 जुलै) आणि तिसरा सामना उद्या 29 जुलैला होणार आहे. परंतु या सामन्यात 9 खेळाडूंना बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे.
या 8 खेळाडूंना पुढील दोन टी-20 सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे. यात पृथ्वी शॉ, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ईशान किशन, देवदत्त पडिक्कल आणि कृष्णपप्पा गौतम हे खेळाडू कुणाल पांड्याच्या संपर्कात असल्याने त्यांना उर्वरित समान्यांसाठी मुकावे लागणार आहे. बाकी खेळाडूंची नावे उद्याप कळू शकलेली नाहीत. आता भारताकडे फक्त 13 खेळाडूंसह उपलब्ध असणार आहेत. त्यात जर कोणी जाखमी झाले तर टीम इंडियाच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. या आता 5 फलंदाज राहिले आहेत. यात एक समाधानाची बाब म्हणजे ऋतुराज गायकवाडला आता सलामीला संधी मिळू शकेल.
Team India playing-11: शिखर धवन (कप्तान), ऋतुराज गायकवाड़, मनीष पांडे, नितीश राणा, संजू सैमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कप्तान), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया
पण पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ईशान किशन (विकेटकीपर), के गौतम, कुणाल पंड्या यांना या सामन्यात खेळता येणार नाही.
सामन्यानंतर कुणाला पांड्या लगेच भारतात येऊ शकणार नाही. भारताचा खेळाडू कुणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पुढील 7 दिवस त्याला विलगीकरणातच राहवे लागणार आहे. कुणाल पांड्या 30 जुलैला भारतात येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.