IPL 2023
IPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पहिल्यांदाच 12 भाषांमध्ये IPL कॉमेंट्री; मिताली राजसह फिंच, स्मिथची नवी इनिंग सुरु

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पंजाबी, ओरिया आणि भोजपुरी भाषेत कॉमेंट्री होणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर हिंदी, इंग्रजीसह 9 भाषांमध्ये कॉमेंट्री असेल. त्याचवेळी, हा सामना जिओ सिनेमावर 12 भाषांमध्ये प्रसारित केला जाईल.

दरम्यान, स्टार टीव्ही आणि जिओ सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये कॉमेंट्री करतील.

जिओकडे पंजाबी, ओरिया आणि भोजपुरी या तीन अतिरिक्त भाषांमध्ये लाइव्ह कॉमेंट्री देखील असेल. स्टार नेटवर्क टीव्हीवर सामना प्रसारित करेल तर जिओ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल. शुक्रवारपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे.

तसेच, अनेक दिग्गज क्रिकेटपटू आयपीएलमध्ये अनेक भाषांमध्ये कॉमेंट्रीसाठी जिओ आणि स्टार स्पोर्ट्सवर पदार्पण करतील. यामध्ये मुरली विजय, एस श्रीशांत, युसूफ पठाण, मिताली राज आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरोन फिंच आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.

स्टीव्ह स्मिथ पहिल्यांदा समालोचन करणार

स्टारने सुनील गावस्कर, जॅक कॅलिस, केविन पीटरसन, मॅथ्यू हेडन, अॅरॉन फिंच, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, डॅनियल व्हिटोरी, डॅनी मॉरिसन, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड हसी यांचा इंग्लिश पॅनेलमध्ये समावेश केला आहे.

आयपीएलमध्ये (IPL) माईक थेमच्या जागी अॅरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ पहिल्यांदाच कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

तसेच, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ख्रिस गेलचा जिओ सिनेमाच्या इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्याच्याशिवाय एबी डिव्हिलियर्स, इऑन मॉर्गन, ब्रेट ली यांचाही इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पॅनेलमध्ये ग्रॅम स्वान, ग्रॅमी स्मिथ, स्कॉट स्टायरिस, संजना गणेशन, सुप्रिया सिंग, सुहेल चंधोक यांचाही समावेश आहे.

मिताली, सेहवाग हिंदी कॉमेंट्री करतील

हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग (Harbhajan Singh), इरफान पठाण, युसूफ पठाण, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, इम्रान ताहिर, दीप दास गुप्ता, अजय मेहरा, पद्मजीत सेहरावत, जतीन सप्रू यांचा समावेश आहे.

तर जिओ सिनेमाने आकाश चोप्रा, पार्थिव पटेल, ओवेश शाह, झहीर खान, सुरेश रैना, अनिल कुंबळे, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, निखिल चोप्रा, साबा करीम, अनंत त्यागी, रिद्धिमा पाठक, सुरभी वैद्य, ग्लेन सलदान्हा यांना कॉमेंट्रीची जबाबदारी दिली आहे.

अतुल वासन, झुलन गोस्वामी, नयन मोंगिया कॉमेंट्री करणार आहे

केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे हे जिओ सिनेमावर त्यांचे अनुभव मराठीत शेअर करताना दिसतील. तर झुलन गोस्वामी, लक्ष्मीरत्न शुक्ला बंगालीमध्ये आयपीएल कॉमेंट्री करतील.

व्यंकटेश प्रसाद कन्नडमध्ये आणि सरनदीप सिंग, अतुल वासन पंजाबीमध्ये जिओ सिनेमासाठी भाष्य करणार आहेत. स्टार मराठीत अमोल मुझुमदार आणि गुजरातीमध्ये नयन मोंगिया कॉमेंट्री करताना दिसतील.

59 दिवसांत 74 सामने होतील

59 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल, 7 घरच्या मैदानावर आणि 7 विरोधी संघापासून दूर. 10 संघांमध्ये लीग टप्प्यातील 70 सामने होतील. लीग स्टेजनंतर, पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

18 डबल हेडर असतील

स्पर्धेत 18 डबल हेडर असतील म्हणजेच 18 वेळा दिवसातून 2 सामने होतील. या दरम्यान, पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होईल आणि दुसरा सामना 7:30 वाजता सुरु होईल. 31 मार्च रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना आणि त्यानंतर 1 आणि 2 एप्रिल रोजी दोन डबल हेडर होतील.

तसेच, 1 एप्रिल रोजी पंजाब-कोलकाता यांच्यात पहिला सामना तर दुसरा लखनऊ-दिल्ली यांच्यात होणार आहे.

त्याचवेळी, 2 एप्रिल रोजी सनरायझर्स-राजस्थान यांच्यात पहिला सामना आणि दुसरा सामना बंगळुरु-मुंबई यांच्यात होणार आहे. 8 एप्रिल आणि 6 मे रोजी या स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येतील.

सर्व सामने 12 शहरांमध्ये होणार आहेत

या स्पर्धेतील 74 सामने 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. आयपीएल संघांच्या 10 शहरांव्यतिरिक्त गुवाहाटी आणि धर्मशाला येथेही सामने होणार आहेत.

गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्स संघाचे घरचे मैदान असेल आणि धरमशाला स्टेडियम हे पंजाबचे घरचे मैदान असेल.

आयपीएल संघांची 10 शहरे मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरु, लखनऊ, हैदराबाद, दिल्ली, मोहाली आणि कोलकाता असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT