IPL 2023 च्या ट्रॉफीवर गुजराज टायटन्स पुन्हा कोरणार नाव, 'हे' आहे मोठे कारण

Gujarat Titans Ready For IPL 2023: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी पदार्पणात इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम गुजरात टायटन्सने केला.
Gujarat Titans
Gujarat TitansDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 News: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी पदार्पणात इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम गुजरात टायटन्सने केला.

आता गुजरात टायटन्सचे आगामी टप्प्यात कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य असेल. गुजरात टायटन्स संघाने IPL 2022 ची ट्रॉफी जिंकली आणि 14 पैकी 10 लीग सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

आयपीएलच्या विजेतेपदानंतर पांड्याचा विश्वासही दुणावला आहे. युवा फलंदाज शुभमन गिलनेही आपल्या कामगिरीने स्वत:ला इतके प्रस्थापित केले की, तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याची निवड निश्चित झाली.

गुजरात टायटन्स आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार

गेल्या आयपीएल हंगामात पांड्या आणि गिल या दोघांनीही गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) फलंदाजीसह चांगली कामगिरी केली, त्यांनी अनुक्रमे 487 आणि 483 धावा केल्या. विशेष म्हणजे, ते त्यांच्या संघाचे सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते.

Gujarat Titans
Mumbai Indians in IPL 2023: बुमराहच्या जागी 'हा' खेळाडू बनणार मुंबई इंडियन्सचे अस्त्र! अशी असू शकते Playing 11

त्याचवेळी, मोहम्मद शमी (Mohammed Shami) (20 विकेट) आणि रशीद खान (19 विकेट) हे त्यांचे मुख्य किलर गोलंदाज होते.

मात्र, या हंगामात गुजरात टायटन्सला त्यांचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला मुकावे लागले, पण त्याच्या अनुपस्थितीमुळे त्यांची गोलंदाजी कमजोर होणार नाही, ज्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटल, वेस्ट इंडिजचा अल्जारी जोसफ, शिवम मावी, यश दयाल आणि आणखी काही गोलंदाजांचा समावेश आहे.

गुजरात टायटन्सची ताकद

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केल्याचे श्रेय दिले पाहिजे, विशेषत: खेळाडूंच्या भूमिकांबाबत स्पष्टता जी अत्यंत महत्त्वाची होती.

Gujarat Titans
IPL 2023: KKR ला मिळाला नवा कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या जागेवर 'हा' अनुभवी खेळाडू करणार नेतृत्व

आगामी हंगामाच्या तयारीदरम्यान, संघाचे अनियमित सदस्य मावी आणि आर साई किशोर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी संघाच्या यशस्वी मोहिमेचे सर्वात मोठे कारण म्हणजे खेळाडूंना त्यांच्या भूमिका माहित होत्या, त्यामुळे ते रणनीतीनुसार खेळले. शीर्षस्थानी गिलच्या विस्फोटक फलंदाजीशिवाय गुजरातकडे पांड्या, बी साई सुदर्शन, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांच्या रुपाने खूप चांगले फलंदाज आहेत, जे विस्फोटक फलंदाजी करु शकतात.

तसेच, केन विल्यमसनचा संघात समावेश होणेही संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच संघात आयर्लंडचा T20 विश्वचषकात हॅटट्रिक करणारा गोलंदाज जोश लिटल आणि वेस्ट इंडिजचा ओडियन स्मिथ यांचा समावेश करण्यात आला आहे.

Gujarat Titans
IPL 2023: पंजाब किंग्जमध्ये ऑस्ट्रेलियाच्या धाकडची एन्ट्री! जॉनी बेअरस्टोची उणीव भासणार नाही

त्याचबरोबर, विल्यमसनकडे आयपीएलमध्ये 2100 धावा आहेत आणि त्याच्याकडे कर्णधारपदाचाही अनुभव आहे, जो कठीण विकेटवर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका बजावू शकतो. आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या तेवतियाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-23 मध्ये देखील आपली आपली गोलंदाजी सिद्ध केली. त्याने आठ सामन्यांमध्ये 14 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com