IPL 2023 पूर्वी केलेल्या नव्या टॅट्यूबद्दल विराटने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'अजूनही तो...'

विराट कोहलीने नुकताच उजव्या हातावर नवा टॅट्यू काढला असून त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli on his New Tattoo: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाचे वेध सध्या अनेक क्रिकेट चाहत्यांना लागले आहेत. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या हंगामासाठी खेळाडू आपापल्या संघात सामील झाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही संघात दाखल झाला आहे. पण या दरम्यान विराटच्या नव्या टॅट्यूने सर्वांचेच लक्ष वेधले.

विराटने त्याच्या उजव्या हातावर नवा टॅट्यू काढला आहे. याबद्दल आरसीबीच्या फोटोशूटदरम्यान त्याने भाष्ट केले आहे. केवळ टॅट्यूबद्दलच नाही, तर त्याने वेगवेगळ्या गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Virat Kohli
Virat Kohli: 'नाटू नाटू' नंतर आता 'लुंगी डान्स'वर थिरकला किंग कोहली, Video व्हायरल

विराटला त्याच्या नवीन टॅट्यूबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, 'हो, पण सध्या या टॅट्यूचे काम सुरू आहे, तो पूर्ण झालेला नाही. तो सध्या अर्धाच पूर्ण झालेला आहे, त्यामुळे मी आत्ता त्याचा अर्थ समजावू शकत नाहीये. पण नक्कीच मी भविष्यात याबद्दल सांगेल.' लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराटच्या शरिरावर एकूण 11 टॅट्यू आहेत.

विराटला त्याच्या टॅट्यूव्यतिरिक्त अन्य प्रश्नही विचारण्यात आले. त्याला महान क्रिकेटपटूंबद्दल विचारल्यावर त्याने सचिन तेंडलकर आणि विव रिचर्ड्स यांचे नाव घेतले. तसेच जर तो रॉजर फेडरर आणि लिओनेल मेस्सीबरोबर एकत्र एकाच टेबलवर बसला, तर काय करशील, असाही प्रश्न विराटला विचारला. त्यावर विराट म्हणाला की तो फार काही बोलणार नाही, फक्त ऐकेल.

Virat Kohli
WPL 2023: RCB साठी शेवटही पराभवानेच! मुंबई इंडियन्सने जिंकली अखेरची लीग मॅच

दरम्यान, आरसीबीने आत्तापर्यंत विजेतेपद जिंकले नसले तरी हा लोकप्रिय संघांपैकी एक आहे. आरसीबी 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या हंगामापासून विराट आरसीबी संघाकडूनच खेळत आहे. त्यामुळे तो एकाच संघाकडून आत्तापर्यंतचे सर्व आयपीएल हंगाम खेळणारा एकमेव खेळाडू आहे.

विराट आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये 223 सामन्यांमध्ये 36.20 च्या सरासरीने 6624 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटच्या 5 शतकांचा आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 6 शतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com