India Women Hockey Team hockeyindia
क्रीडा

Hockey Pro League 2023-24: भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियानंतर अमेरिकेवर शुटआऊटमध्ये रोमांचक विजय, बोनस पाँइंटचीही कमाई

India Women Hockey Team: एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारतीय महिला संघाने रविवारी अमेरिकेविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये विजय मिळवला.

Pranali Kodre

Indian Women’s Hockey Team beat United States 1-1 (2-1) in thrilling shootout of FIH Hockey Pro League 2023-24:

भारतातील रुरकेला शहरामध्ये एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धातील महिलांचे सामने खेळवण्यात आले. रुरकेला लेगमधील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने रविवारी (18 जानेवारी) अमेरिकेला 2-1 अशा फरकाने पेनल्टी शुटआऊटमध्ये मात दिली.

भारताने त्यामुळे बोनल पाँइंटचीही कमाई केली. या सामन्यात भारताची कर्णधार आणि गोलकिपर सविताची कामगिरी महत्त्वाची ठरली.

बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेनंतर १-१ अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले. यामध्ये सविताने शानदार बचाव करताना अमेरिकेचे चार प्रयत्न हाणून पाडले. भारताकडून मुमताझ खान आणि सोनिका यांनी पेनल्टी शुटआऊटमध्ये अचूक निशाणा साधला.

दरम्यान निर्धारित वेळेत भारताकडून दिपीका (19') आणि अमेरिकेकडून अश्ली सेसा (45') यांनी प्रत्येकी एक गोल केला.

या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला होता. तसेच भारताचा चेंडूवर चांगला ताबा होता. पण त्यांना सातत्याने अमेरिकेच्या बचावाने आव्हान दिले. दरम्यान, पहिल्या क्वार्टरमध्ये कोणालाच गोल करताना आला नाही.

मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर दिपीकाने 19 व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल नोंदवला. दरम्यान, सामन्यातही सविताने अनेकदा अमेरिकेचे आक्रमण परतवून लावले होते. पहिल्या हाफपर्यंत भारताकडे 1-0 अशी आघाडी होती.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून लालरेमसियामीने शानदार कौशल्य दाखवले होते. परंतु, भारताने गोलसाठी केलेले प्रयत्न अमेरिकेची गोलकिपर केल्सी बिंगने फोल ठरवले.

तसेच या क्वार्टरमधील अगदी शेवटच्या मिनिटाला अश्ली सेसाने अमेरिकेसाठी गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.

अखेरच्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांला गोल करण्यात अपयश आल्याने सामन्यात बरोबरी झाली आणि पेनल्टी शुटआऊट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शुटआऊटमध्ये लीह क्राऊसलाच अमेरिकेकडून गोल करता आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT