Goa Eco-Tourism Policy: पेडणे ते काणकोण... निसर्गाचा अनमोल ठेवा आता पर्यटकांसाठी खुला! 'इको-टुरिझम' धोरण ठरणार गेमचेंजर; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Goa Budget Session 2026: गोव्याच्या ग्रामीण भागातील पर्यटन क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी आणि तिथे पर्यटनाला चालना देण्यासाठी 'इको-टुरिझम' धोरण राबवणे अत्यंत आवश्यक आहे.
Goa Eco-Tourism Policy
minister rohan khaunteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या ग्रामीण भागातील पर्यटन क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी आणि तिथे पर्यटनाला चालना देण्यासाठी 'इको-टुरिझम' धोरण राबवणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारचे या दिशेने प्रयत्न सुरु असून पेडणे ते काणकोणपर्यंतच्या सर्वच भागांत इको-टुरिझमचा विस्तार केला जाईल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोवा विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये दिली. अधिवेशनादरम्यान आमदार आलेक्सो रेजिनाल्डो लोरेन्को यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

आमदार लोरेन्को यांनी इको-टुरिझम क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना मंत्री खंवटे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक पंचायतींकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्यामार्फत नियमितपणे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. गरज भासल्यास संबंधित ठिकाणचे देखभाल कर्मचारी किंवा गोवा पर्यटन विकास महामंडळ स्वतः या देखभालीची जबाबदारी स्वीकारेल. सरकार केवळ पर्यटन वाढवण्यावरच नाही, तर त्या ठिकाणची स्वच्छता आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावरही भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Goa Eco-Tourism Policy
Eco Tourism Goa: ..असे झाले तर गोव्याच्या काही समुद्रकिनाऱ्यांसारखेच, धबधब्यांचे परिसर कचराकुंड्यांमध्ये बदलतील

यावेळी मंत्री खंवटे यांनी गोव्यातील होमस्टे (Homestays) संस्कृतीच्या यशस्वी वाटचालीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, 'एअरबीएनबी'च्या (Airbnb) सहकार्याने राज्यात आतापर्यंत 200 हून अधिक होमस्टे सुरु करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे, हे सर्व होमस्टे महिलांमार्फत चालवले जात आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना केवळ रोजगारच मिळाला नाही, तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षमही झाल्या आहेत. 'गोवा (Goa) बियाँड बीचेस' या संकल्पनेला याद्वारे बळकटी मिळत असून पर्यटकांना आता गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचा आणि आदरातिथ्याचा अनुभव थेट स्थानिकांच्या घरातून घेता येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com