Hockey Jr. World Cup: टीम इंडियाचे पदक हुकले! स्पेनने पराभवाचा धक्का देत तिसऱ्या क्रमांकावर केला कब्जा

India Hockey Team: ज्युनियर हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचे कांस्य पदक थोडक्यात हुकले आहे.
Hockey India
Hockey IndiaX/TheHockeyIndia

India Hockey Team lost Bronze medal match to Spain by 1-3 at Junior Men’s World Cup Malaysia 2023

मलेशियाला झालेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचे कांस्य पदक थोडक्यात हुकले आहे. या स्पर्धेत भारत आणि स्पेन संघात शनिवारी (16 डिसेंबर) कांस्य पदकासाठी सामना झाला. या सामन्यात भारताला 1-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात भारताकडून सुनील जोजोने एकमेव गोल केला. तसेच स्पेनकडून निकोलस अल्वारेजने 2 गोल केले आणि पॉव पेचेमने एक गोल केला. त्यामुळे स्पेनने कांस्य पदकावर नाव कोरले.

या सामन्यात भारताने चागली सुरुवात केली होती. सातव्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर भारताने मिळवला होता. पण त्यावर गोल करण्यात अपयश आले. त्यानंतरही भारताने आक्रमण सुरू ठेवले, पण स्पेनने पहिल्या क्वार्टरममध्ये गोल होऊ दिला नाही. त्यामुळे पहिला क्वार्टर 0-0 असा संपला.

Hockey India
Hockey Junior World Cup: पहिल्याच सामन्यात डझनभर गोल करणाऱ्या भारतीय महिलांचं आव्हान सलग दोन पराभवानंतर संपलं

दुसऱ्या क्वार्टरमध्ये अल्वारेजने स्पेनला 25 व्या मिनिटाला पहिला गोल करून दिला. त्याच्या तीनच मिनिटात भारताच्या सुनील जोजोने गोल नोंदवत बरोबरी साधली. पहिल्या हाफमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली.

दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने आणखी खेळ उंचावला. त्यांनी भारताच्या बचावाला तगडे आव्हान दिले. त्यातर पेचेमने 40 व्या मिनिटाला संघाला दुसरा गोल करून दिला. त्यामुळे स्पेनला 2-1 अशी आघाडी मिळाली. शेवटच्या 15 मिनिटातही भारताने गोलचे अनेक प्रयत्न केले, पण ते स्पेनच्या बचावाला भेदू शकले नाहीत.

दरम्यान, अखेरच्या क्वार्टरमध्ये स्पेनकडून कॅब्रे वेर्डिलने गोलची चांगली संधी निर्माण केली, ज्या संधीचा फायदा घेत अल्वारेजने 51 व्या मिनिटाला त्याचा दुसरा, तर संघासाठी तिसरा गोल नोंदवला.

त्यानंतरही 54 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नवर गोलची संधी होती, पण अरायजीन हुंडलचा प्रयत्न स्पॅनिश बचावाने फोल ठरवला.

Hockey India
Hockey Jr. World Cup: भारत सेमीफायनलमध्ये दाखल! नेदरलँड्सविरुद्ध कर्णधाराचा विजयी गोल, तर रोहित सामनावीर

भारताने अखेरची चांगली झुंज दिली, पण स्पेन या सामन्यात वरचढ ठरला. त्यामुळे भारताचे पदक हुकले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2021 मध्येही ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ कांस्य पदकाचा सामना हरला होता.

जर्मनी विश्वविजेता

ज्युनियर हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनी आणि फ्रान्स आमने-सामने होते. या अंतिम सामन्यात जर्मनीने फ्रान्सचा 2-1 अशा फरकाने पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याचमुळे जर्मनीने सुवर्णपदक, फ्रान्सने रौप्य पदक जिंकले.

विशेष म्हणजे याचवर्षी सुरुवातीला जर्मनीच्या वरिष्ठ पुरुष हॉकी संघानेही वर्ल्डकप जिंकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com