Hockey Pro League 2023-24: श्रीजेशचा मोक्याच्या क्षणी कमालीचा बचाव, भारताने नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये चारली धूळ

India Hockey Team: हॉकी प्रो लीग 2023-24 स्पर्धेत बलाढ्य नेदरलँड्सला भारतीय संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का दिला.
India Hockey Team
India Hockey TeamX/TheHockeyIndia
Published on
Updated on

India thrilling 4-2 shootout win against Netherlands in FIH Hockey Pro League 2023-24

भारतीय हॉकी संघाने रविवारी एफआयएच हॉकी प्रो लीग २०२३-२४ स्पर्धेत गतविजेत्या नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाची धूळ चारली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेनंतर २-२ अशी बरोबरी झाली होती.

त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने ४-२ अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा हिरो गोलकिपर पीआर श्रीजेश ठरला.

कलिंगा हॉकी स्टेडियेमवर झालेल्या या सामन्यात श्रीजेशने पेनल्टी शूटआऊटमध्ये शानदार बचाव केला. त्याने दोन गोल वाचवले. त्यामुळे भारताला विजय मिळवणे सोपे झाले होते. भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय आणि शमशेर सिंग यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये अचूक निशाणा साधला.

त्याआधी सामन्यात भारताकडून हार्दिक सिंग (13') आणि हरमनप्रीत सिंग (58') यांनी प्रत्येकी एक गोल केला. तसेच नेदरलँड्सकडून जिप जानसेन (30') आणि कोईन बिजेन (39') यांनी प्रत्येकी एक गोल केला होता.

India Hockey Team
Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिला इटलीवर दणदणीत विजयासह सेमीफायनलमध्ये! पॅरिस ऑलिम्पिकच्या आशाही जिवंत

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँड्सने पहिल्याच क्वार्टरच्या अगदी सुरुवातीलाच भारताच्या सर्कलमध्ये प्रवेश केला होता. पण सुरुवातीला कृष्णन बी पाठकने गोलकिपिंग करताना त्यांचे काही प्रयत्न फोल ठरवले.

त्यानंतर भारतानेही सामन्यात पुनरागमन केले. 12 व्या मिनिटाला भारताला दोन पेनल्टी कॉर्नरही मिळाले होते. परंतु, भारताला गोल करता आला नाही. मात्र, पुढच्याच मिनिटाला हार्दिक सिंगने पहिला गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर चांगला ताबा मिळवला होता, तसेच पेनल्टी कॉर्नरवरही त्याला गोल करण्याची संधी मिळालेली, पण गोल करण्यात अपयश आले.

नेदरलँड्सलाही 25 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले. अखेर त्यांच्याकडून 30 व्या मिनिटाला जानसेनने पहिला गोल नोंदवला. त्यामुळे पहिला हाफ संपला तेव्हा सामन्यात 1-1 अशी बरोबरी होती.

India Hockey Team
Indian Hockey Player Varun Kumar: बलात्काराचा आरोप असणाऱ्या वरुणची 'या' लीगमधून माघार; टीम इंडियाला मोठा धक्का

तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांकडून गोलचे प्रयत्न झाले. मात्र भारताला गोल करता आला नाही, पण नेदरलँड्सकडून बिजेनने 39 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यामुळे नेदरलँड्सने आघाडी मिळवली होती.

शेवटच्या क्वार्टरमधील अखेरची पाच मिनिटे राहिलेली असतानाही नेदरलँड्स आघाडीवर होते. पण अखेरची अवघी 3 मिनिटे राहिलेली असताना हरमनप्रीतने आपल्या या 200 व्या सामन्यात गोल नोंदवत भारताला बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली.

आता भारताचा या स्पर्धेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com