Goa LPG Cylinder: गोव्यात गॅस सिलिंडरचा किती आहे साठा? CM सावंतांनी दिले दिलासादायक उत्तर; अतिरिक्त पुरवठ्याचीही होणार व्यवस्था

Goa LPG cylinder stock: राज्यात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा सध्या पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
Goa LPG cylinder stock
Goa LPG cylinder stockDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा सध्या पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. राज्यात किमान एका महिन्यासाठी पुरेल इतका सिलिंडर साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

अलीकडे काही ठिकाणी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी परिस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, राज्यातील गॅस पुरवठा व्यवस्था सुरळीत असून वितरकांकडे पुरेसा साठा आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांनी अनावश्यकपणे सिलिंडर साठवून ठेवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभेत या विषयावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सावंत यांनी सांगितले की, राज्यातील मागणी लक्षात घेऊन साठ्याचे नियोजन केले जाते. सध्या उपलब्ध असलेला साठा पुढील एक महिना पुरेल इतका आहे आणि पुरवठा साखळी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Goa LPG cylinder stock
LPG Cylinder Price Hike: लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन सिलींडर दरवाढीचा निषेध, महिला काँग्रेसचे अनोखे आंदोलन Video

दरम्यान, गॅस पुरवठ्याबाबत काही अफवा पसरत असल्याचीही माहिती सरकारच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Goa LPG cylinder stock
LPG Cylinder Price Hike: मध्य पूर्वेतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला! नवे दर आजपासून लागू

सरकारकडून गॅस वितरण यंत्रणेवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पुरवठ्याचीही व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. नागरिकांना नियमितपणे गॅस उपलब्ध राहावा यासाठी पुरवठादार आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com