Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

India vs England: यशस्वी जयस्वालला 53 वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी; कराव्या लागणार इतक्या धावा!

Manish Jadhav

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी करत आहे. 22 वर्षीय यशस्वीने विझाग (विशाखापट्टणम) कसोटी सामन्यात 209 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर राजकोट कसोटीतही या युवा फलंदाजाने भारताच्या दुसऱ्या डावात 214 धावा केल्या. यशस्वी ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्यामुळे तो या मालिकेत आणखी एक मोठा विक्रम करण्याच्या जवळ आहे.

यशस्वी गावस्करचा 230 धावा करताच विक्रम मोडेल

वास्तविक, महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा 53 वर्ष जुना विक्रम मोडण्याची यशस्वीला संधी आहे. सध्या गावसकर हेच फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी मालिकेत सर्वाधिक 774 धावा केल्या आहेत. म्हणजेच यशस्वीने उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 230 धावा केल्या तर तो कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.

सुनील गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत खळबळ उडवून दिली होती. गावस्कर यांनी 4 कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी 774 धावा (दुहेरी शतक आणि तीन अर्धशतकांसह 4 शतके) केल्या होत्या. या काळात गावस्कर यांची सरासरी 154.80 होती. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा भारतीय विक्रम आहे.

कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा (भारतीय फलंदाज)

सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (1971) – 4 सामने, 774 धावा, 154.80 सरासरी, 4 शतके

सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (1978-79) – 6 सामने, 732 धावा, 91.50 सरासरी, 4 शतके

विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2014-15) – 4 सामने, 692 धावा, 86.50 सरासरी, 4 शतके

विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (2016) – 5 सामने, 655 धावा, 109.16 सरासरी, 2 शतके

दिलीप सरदेसाई विरुद्ध वेस्ट इंडीज (1971) – 5 सामने, 642 धावा, 80.25 सरासरी, 3 शतके

दुसरीकडे, यशस्वी जयस्वालने इंग्लंडमधील चालू कसोटी मालिकेत आतापर्यंत सहा डावांत 109 च्या सरासरीने 545 धावा केल्या आहेत, ज्यात दोन द्विशतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. या काळात यशस्वीचा स्ट्राइक-रेट 81.1 आणि सरासरी 109 होता.

यशस्वीने सध्याच्या मालिकेत 50 चौकार आणि 22 षटकार मारले आहेत. म्हणजेच त्याने चौकार आणि षटकारांसह 332 धावा केल्या आहेत. 545 धावांसह, यशस्वी जयस्वाल सध्याच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यशस्वीनंतर इंग्लिश सलामीवीर बेन डकेटने (288) सर्वाधिक धावा केल्या आहेत. यशस्वीशिवाय या मालिकेत आतापर्यंत एकाही फलंदाजाला 300 धावाही करता आलेल्या नाहीत.

भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, आकाश दीप.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT