IND vs ENG: 'आमच्या संघाकडे कुठेही जिंकण्याची क्षमता...', भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर खेळपट्टीबाबत रोहितचं मोठं भाष्य

Rohit Sharma on Pitches: राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीबाबत भाष्य केले आहे.
Rohit Sharma  - Ravindra Jadeja | Team India
Rohit Sharma - Ravindra Jadeja | Team IndiaAFP

Rohit Sharma reacted on pitches after India won test match against England in Rajkot:

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध रविवारी (18 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील तिसरा सामना तब्बल 434 धावांनी जिंकला. हा भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला.

राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 122 धावांवर सर्वबाद झाला.

दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीवर देखील भाष्य करताना म्हटले की भारताकडे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची क्षमता आहे.

Rohit Sharma  - Ravindra Jadeja | Team India
Rohit Sharma: राजकोटमध्ये रो'हिट'! शतक ठोकत रचले विक्रमांचे मनोरे, दिग्गजांच्या पंक्तीत सामील

रोहित म्हणाला, 'अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांवर आम्ही खूप सामने जिंकले आहेत. फिरकीला पोषक खेळपट्ट्या आमची ताकद राहिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला संतुलन मिळते. आम्ही गेली अनेवर्षे निकाल दिले आहेत आणि भविष्यातही मिळत राहतील.'

'मात्र, आमचे काही गोष्टींवर नियंत्रण नाही. आम्ही खेळपट्टी आम्हाला फिरणारी हवी आहे की नाही, याची चर्चा करत नाही. आम्ही येथे सामन्याच्या दोन दिवस आधी आलो होतो. त्यानंतर दोन दिवसात आम्ही काय करू शकणार आहे?'

'क्युरेटर याचा निर्णय घेतात आणि खेळपट्टी बनवतात. कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्याची आणि जिंकण्याची क्षमता आमच्या संघात आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनला कसोटी सामना जिंकला आहे, सर्वांना माहित होते तिथे कोणत्याप्रकारची खेळपट्टी होती.

केपटाऊनला यावर्षाच्या सुरुवातीला झालेला कसोटी सामना भारताने दीडच दिवसात जिंकला होता.

Rohit Sharma  - Ravindra Jadeja | Team India
IND vs ENG: इंग्लंडच्या बझबॉलवर जयस्वाल भारी! 12 षटकार अन् 14 चौकारांसह डबल सेंच्युरी करत रचला विक्रमांचा डोंगर

रोहित पुढे म्हणाला, 'गेल्या तीन कसोटीत आमच्यासमोर वेगवेगळी आव्हाने होती. हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटीत चेंडू फिरत होता आणि खेळपट्टी धीमी होती. विशाखापट्टणमला चेंडू खाली राहत होता. खेळ जसा पुढे गेला, तशी खेळपट्टी धीमी होत गेली.'

'येथे (राजकोट) पहिल्या तीन दिवशी खेळपट्टी चांगली होती. पण आज चेंडू फिरायला लागला आणि खाली राहत होता. हे खेळपट्ट्यांचे स्वभाव आहेत. भारतात अशाच खेळपट्ट्या पाहायला मिळतात. जर आम्हाला फिरणारी खेळपट्टी मिळाली, तरी आम्ही त्यावर खेळू.'

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेचा चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com