

पणजी: घरात वडिलांचे पार्थिव, बारावीची परीक्षा देण्याची वेळ होत आलेली. शोकमग्न विद्यार्थ्याच्या घरी शिक्षक येतात आणि त्याला घेऊन परीक्षा केंद्रावर दाखल होतात. या संवेदनशीलतेचे दुर्मिळ दर्शन आज बारावीच्या परीक्षेत काणकोण केंद्रावर घडले.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रलेखा मेस्त्री यांनी परीक्षा केंद्रप्रमुख या नात्याने दाखवलेली समयसुचकता कौतुकाची ठरली आहे. केंद्रावर परीक्षेसाठी पाटणे येथील आज तनीश पागी हा विद्यार्थी आला नसल्याचे दिसले. त्यांनी लागलीच प्राचार्यांशी संपर्क साधला.
तेव्हा विद्यार्थ्याच्या वडिलांचे सकाळी निधन झाल्याचे समजले. सध्या बारावी परीक्षेस पुरवणी परीक्षा ही पद्धती नाही.
त्यामुळे विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाईल, या विचाराने बेचैन झालेल्या मेस्त्री यांनी प्राचार्यांना विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर ने आण करण्यासाठी गाडी पाठवण्याची विनंती केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.