

Ponda Politics : फोंड्यातील येणाऱ्या पोटनिवडणुकीत रंग भरू लागला असून सध्या राजकीय पक्ष उमेदवाराच्या शोधात आहेत. यावेळेला तर आम आदमी पक्षाने फोंड्याची जागा जिंकण्याची ईर्षा बाळगली असून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांना उमेदवारीसाठी गळ घातली जात आहे.
फोंडा पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी फोंड्यातील विविध विषय हाती घेतले जात आहेत. कालच फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळातील समस्यांप्रकणी आपने आवाज उठवला होता.
फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांचे निधन झाल्यानंतर आता ही पोटनिवडणूक होत आहे. त्यात भाजप, काँग्रेस आणि आप उडी घेणार आहे. आरजी पक्षात अजून सामसूम असून
बऱ्यापैकी मतदान असलेल्या आरजी पक्षाकडून ऐनवेळी उमेदवार जाहीर करणार की यंदा पोटनिवडणुकीतून माघार घेणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
आपकडून सध्या उमेदवारासाठी चाचपणी सुरू आहे. त्यातच व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांना आपकडून गळ घातली जात आहे. खुद्द व्यंकटेश नाईक यांनीच याबाबतची माहिती दिली. आपल्याकडे
आपवाले आले होते, पण आपण त्यांना कोणतेच आश्वासन दिलेले नाही. लोकांची भावना लक्षात घेऊनच निर्णय घेणार असून आपसोबत जाण्याऐवजी अपक्ष उमेदवारी दाखल करू, असे व्यंकटेश नाईक म्हणाले.
यावेळेला आपण फोंड्याची पोटनिवडणूक लढवणार असून आपण निवडणुकीत उतरावे, ही लोकांचीही इच्छा आहे. त्यामुळे आपण जास्त करून अपक्ष उमेदवारी दाखल करू. यावेळेला फोंड्यात अनेक इच्छुक आहेत, त्यातून चांगला काम करणारा उमेदवारच निवडून येणार असून आपल्याला खात्री आहे, आपण निश्चितच जिंकून येऊ.
- व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.