Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Video: जरा सांभाळून! WTC फायनलला सुरुवात होण्याआधीच रोहितचा पाय अडखळला अन्...

कसोटी चॅम्पियनशीप फायनलला सुरुवात होण्याआधी रोहित शर्मा दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावला.

Pranali Kodre

Rohit Sharma Nearly falls during walking out for toss for WTC 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. हा सामना इंग्लंजमधील द ओव्हल मैदानात होत आहे. दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्मा पडण्यापासून थोडक्यात वाचला.

झाले असे की या अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी मैदानात येत असताना रोहित पायऱ्यांवरून खाली उतरत होता. त्याचवेळी पायऱ्या उतरत असताना त्याचा पाय अडखळला. पण त्याने स्वत:ला लगेचच सावरले. त्यामुळे तो पडण्यापासून वाचला आणि परिणामी मोठ्या दुखापतीचा धोकाही टळला.

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोही सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक सोशल मीडिया युजर्सने याकडेही लक्ष वेधले की ज्यावेळी रोहित पायऱ्यांवरून उतरत होता, त्यावेळी सामना पाहणाऱ्या काही प्रेक्षकांच्या हातात एक बॅनर होते, ज्यावर 'विराट तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील', असे बॅनर होते.

रोहितचा 50 वा कसोटी

दरम्यान, हा सामना रोहितसाठी वैयक्तिकरित्याही खास आहे. हा त्याचा त्याच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना आहे. दरम्यान, भारतासाठी 50 कसोटी सामने खेळणारा रोहित 36 वा खेळाडू आहे. 

रोहितने जिंकली नाणेफेक

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 च्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाज असे संमिश्रण केले आहे. 

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT