Rohit Sharma on WTC Final: इंग्लंडमध्ये कांगारुंना कशी देणार मात? रोहित म्हणतोय, 'आव्हान आहे, पण...'

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

Rohit Sharma statement ahead of WTC Final 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 ते 11 जून दरम्यान कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील लंडनच्या द ओव्हल मैदानावर हा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहितने आयसीसीच्या 'अफ्टरनून विथ टेस्ट लिजंड्स' या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, रॉस टेलर आणि इयान बेल यांच्याशी बोलताना इंग्लंडमध्ये आणि द ओव्हल मैदानावर खेळण्याबद्दल आपली मतं मांडली आहेत.

रोहित म्हणाला, 'साधारत: इंग्लंडमध्ये फलंदाजांसाठी आव्हानात्मक परिस्थिती असते. जोपर्यंत तुम्ही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहाता, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत राहते.'

Rohit Sharma
India vs Australia: ऑस्ट्रेलियाला जबरदस्त धक्का! WTC Final मधून 'हा' स्टार खेळाडू बाहेर

रोहितने इंग्लंडमधील त्याच्या अनुभवातून शिकले असल्याचे सांगितले. तो म्हणाला, 'साल 2021 मध्ये मला एक गोष्ट समजली की तुम्ही कधीही खेळपट्टीवर स्थिर होत नाही आणि वातावरणही बदल असते. तुम्हाला बराच काळ लक्ष केंद्रित करावे लागते आणि मग तुम्हाला याची जाणीव होईल की केव्हा तुम्ही गोलंदाजांवर आक्रमण करू शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला खेळपट्टीवर जाऊन तुमची ताकद काय आहे, हे समजून घ्यावे लागते.'

याशिवाय रोहितने ओव्हलवर यशस्वी ठरलेल्या जुन्या खेळाडूंच्या खेळण्याच्या पद्धतीचीही मदत होऊ शकते, असे सांगतिले आहे.

तो म्हणाला, 'मी त्यांचे (यशस्वी खुळाडू) अनुकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही, पण त्यांची धावा करण्याची पद्धत जाणून घेणे चांगले असेल. मला जे सापडले आहे, ते असे की ओव्हलवरील स्क्वेअरच्या बाऊंड्री पुरेशा वेगवान आहेत.'

Rohit Sharma
Engalnd Team for Ashes: WTC Final नंतर होणाऱ्या ऍशेसच्या पहिल्या दोन मॅचसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 खेळाडूंना संधी

नुकताच मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2023 मध्ये नेतृत्व केल्यानंतर कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी आलेल्या रोहितने असेही सांगितले की वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांमध्ये खेळणे आव्हानात्मकही आहे, पण तो याचा आनंदही घेतो.

तो म्हणाला, 'वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांमध्ये खेळणे नक्कीच आव्हानात्मक आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारात खेळता. त्यामुळे मानसिकरित्या तुम्ही जुळवून घेणे आणि तुमच्या तंत्रात बदल करणे महत्त्वाचे असते. तुम्ही स्व:ताशी संवाद साधला पाहिजे आणि मानसिकदृष्टीने तयार राहिले पाहिजे.'

कसोटी क्रिकेटबद्दल रोहित म्हणाला, 'कसोटी क्रिकेट तुम्हाला नेहमीच आव्हान देत असते. तुम्हाला अशी परिस्थिती आवडते आणि कसोटी क्रिकेट एक व्यक्ती तुमच्यातील सर्वोत्तम बाहेर आणते. गेल्या 3-4 वर्षात कसोटीमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले आहे. आता केवळ अखेरचा अडथळा पार करायचा आहे आणि युवा खेळाडूंना आत्मविश्वास द्यायचा आहे की ते त्यांना हव्या त्या पद्धतीने खेळू शकतात.'

विशेष म्हणजे रोहितसाठी कसोटी कर्णधार म्हणून देखील कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना परदेशातील पहिला सामना असणार आहे. त्यामुळे तो या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com