Goa Sports award pending for six years Dainik Gomantak
क्रीडा

Goa: तब्बल सहा वर्षांचे क्रीडा पुरस्कार प्रलंबित

Goa: क्रीडा व युवा व्यवहार खात्याकडून अजूनही प्रक्रिया अपूर्णावस्थेत

किशोर पेटकर

पणजी: गोवा सरकारच्या (Government of Goa) क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे (Directorate of Sports and Youth Affairs) देण्यात येणारा बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर राज्य क्रीडा पुरस्कार (Bakshi Bahaddar Jivabadada Kerkar State Sports Award) दीर्घकाळ प्रलंबित आहे, त्याचे कधी वितरण होईल याबाबत स्पष्टता नाही. तब्बल सहा वर्षांतील पुरस्कार प्रक्रिया अपूर्णावस्थेत आहे आणि कधी पूर्ण होईल याबाबत संबंधित अनभिज्ञ आहेत. क्रीडा व युवा व्यवहार खात्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘2015 पासून खेळाडू व आयोजकांचे पुरस्कार देण्यात आलेले नाही. या पुरस्कारासाठी राज्यभरातून भरपूर अर्ज आले आहेत. पुढील प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही. एकूण दोन समित्या असून त्यांच्यामार्फत पुरस्कार विजेते निश्चित केले जातात. छाननी समिती अगोदर आलेल्या अर्जांची छाननी करेल, नंतर निवड समिती त्यावर शिक्कामोर्तब करेल. संख्या भरपूर असल्याने अजून अर्जांची छाननीच झालेली नाही. त्या समितीची बैठकही झालेली नाही. गोवा क्रीडा प्राधिकरण पुरस्कार विजेत्यांची यादीस अंतिम स्वरूप देईल आणि नंतर क्रीडा खात्यातर्फे त्यांचे वितरण होईल.’’ गोव्याचे थोर मराठा सेनानी बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर यांच्या स्मरणार्थ राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो.

मागील वेळेस 30 जणांना पुरस्कार

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 25 जानेवारी 2018 रोजी शेवटच्या वेळेस बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण झाले होते. तेव्हा 2002 ते 2014 या कालावधीसाठी एकूण 30 जणांना पुरस्कार देण्यात आला होता. यामध्ये 22 क्रीडापटू व 8 क्रीडा आयोजकांचा समावेश होता. क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात, माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी 2015 पासूनचे पुरस्कार देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून तसे झालेले नाही. त्यामुळे मागील सहा वर्षांचे पुरस्कार कधी दिले जातील याबाबत खुद्द क्रीडा खाते व प्राधिकरणाकडे स्पष्टता नाही. त्यामुळे क्रीडापटू व आयोजकांत नाराजी आहे.

``क्रीडा पुरस्कार प्रत्येक खेळाडूस प्रोत्साहित व प्रेरित करतो. तो वेळीच मिळणे आवश्यक आहे. सरकारने खेळाडूंना सन्मानित करून त्यांच्या कामगिरीची पावती द्यावी. जीवबादादा केरकर पुरस्कार वितरण लवकरच होईल अशी आशा बाळगतो.

-धर्मा चोडणकर, अध्यक्ष

गोवा सॉफ्टबॉल असोसिएशन

बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर क्रीडा पुरस्काराविषयी...

- पहिलांदा पुरस्कार ः 1971-72 मध्ये

- पहिले मानकरी ः बर्नाड परेरा (फुटबॉल) व एल्मा डिकुन्हा (अॅथलेटिक्स)

- पुरस्काराचे स्वरूप ः प्रत्येकी 25 हजार रुपये, ब्राँझ पुतळा व मानपत्र

- आतापर्यंतचे मानकरी ः 171

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT