Sports: गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा होणारच

गोव्यात होणाऱ्या 36व्या राष्ट्रीय क्रिडा (Goa Sports) स्पर्धांसाठी 37 क्रिडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली
Shripad Naik, President, Goa Olympic Association
Shripad Naik, President, Goa Olympic Association

फातोर्डा: गोव्यात 36व्या राष्ट्रीय क्रिडा (Sports) स्पर्धा कुठल्याही परिस्थितीत होणारच अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री व गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे (Goa Olympic Association) अध्यक्ष श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी आज मडगावी या प्रतिनिधीस सांगितले. या स्पर्धांसाठी गोव्याने सर्व तयारी केली आहे. क्रिडा स्पर्धेला आवश्यक सर्व साधन सुविधा तयार केल्या आहेत. त्यासाठी जो खर्च केला गेला आहे तो का व्यर्थ जाऊ द्यायचा असा प्रश्र्नही नाईक यांनी केला. (36th National Games will be held in Goa under any circumstances)

या स्पर्धा दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. पण या वेळी 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणार होत्या त्या कोविड महामारीमुळेच पुढे ढकलण्यात आल्या याची नोंद घेणे आवश्यक असल्याचेही नाईक म्हणाले.

Shripad Naik, President, Goa Olympic Association
Goa: काणकोण पालिका भवनाचे बांधकाम येत्या महिन्यांपासून सुरू

गोव्यातील स्पर्धा रद्द झालेली नाही. जपानमधील ऑलिंपिक स्पर्धा संपल्यावर व कोविड महामारीची भारतातील स्थितीचा अंदाज घेऊनच गोव्यातील स्पर्धा आयोजनासंदर्भात भारतीय ऑलिंपिक असोसिएशनकडे संपर्क साधला जाईल असेही नाईक यांनी सांगितले. 

Shripad Naik, President, Goa Olympic Association
Goa Politics: ‘आप’मुळे भाजपची झाली गोची; वाचा सविस्तर

गोव्यात होणाऱ्या 36व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी 37 क्रिडा प्रकारांना मंजुरी देण्यात आली असुन बांबोळी अॅथलेटीक स्टेडियम, कांपाल जलतरण तलाव, कांपाल इनडोअर, डॊ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, फातोर्डा येथील नेहरु स्टेडियम, मिरामार समुद्र किनारा, पेडे इनडोअर स्टेडियम, वास्को येथील टिळक मैदान, नावेली मडगाव येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियमचा वापर करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com