Marnus Labuschagne Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023 Video: जरा विचित्रच! लॅब्युशेनने ग्राउंडवरील च्युइंगम पुन्हा टाकलं तोंडात, घटना कॅमेऱ्यात कैद

Video: मार्नस लॅब्युशेनने मैदानावरील च्युइंगम पुन्हा तोंडात टाकल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Marnus Labuschagne picking up chewing gum from ground and putting it back into mouth:

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस 2023 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना मार्नस लॅब्युशेन जमीनीवरून च्युइंगम उचलून खाताना दिसला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ही घटना ऑस्ट्रेलिया या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना 43 व्या षटकापूर्वी घडली. या षटकात स्टुअर्ट ब्रॉडने गोलंदाजी करण्यासाठी तयारी करत असतानाच स्टीव्ह स्मिथबरोबर फलंदाजी करत असलेला लॅब्युशेन त्याची बॅट व्यवस्थित करत होता. याचवेळी त्याच्या तोंडातून च्युइंगमचा तुकडा खाली पडला.

त्याने नंतर जमीनीवरून काहीतरी उचलून पुन्हा तोंडात टाकल्याचे दिसले. त्यावेळी त्याने त्याच्या तोंडातून पडलेला च्युइंगमच पुन्हा उचलून खाल्याचा कयास अनेक क्रिकेट चाहत्यांनी लावला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यावर क्रिकेट चाहत्यांकडून विविध मतं व्यक्त होत आहेत. अनेकांनी या घटनेला विनोदी म्हटले आहे, तर काहींनी लॅब्युशेनला निष्काळजी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 110 धावांची शतकी खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 77 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर वॉर्नरने 66 धावांची खेळी केली. याशिवाय लॅब्युशेननेही स्मिथबरोबर 102 धावांची भागीदारी करताना 47 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला 76.2 षटकात सर्वबाद 325 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडला 91 धावांनी पिछाडी स्विकारावी लागली. इंग्लंडकडून बेन डकेटने 98 धावांची खेळी केली.

तसेच हॅरी ब्रुकने 50 धावांची खेळी केली. याशिवाय झॅक क्रावलीने 48 आणि ऑली पोपने 42 धावांती खेळी केली. याशिवाय कोणालाही फार काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT