Steve Smith Century Ashes 2023: स्मिथचा जलवा! विक्रमी 32 वे शतक ठोकत सचिन, पाँटिंग अन् ब्रॅडमनलाही टाकलं मागे

Steve Smith: स्टीव्ह स्मिथने ऍशेस 2023 मध्ये लॉर्ड्स कसोटीत खेळताना विक्रमी 32 वे शतक झळकावले
Steve Smith
Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

Steve Smith Smash 32nd Test Century: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर बुधवारपासून (28 जून) सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीला उतरला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या.

या डावात स्मिथने 184 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या. हे स्मिथचे कसोटी क्रिकेटमधील 32 वे शतक ठरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 44 वे शतक आहे.

Steve Smith
Steve Smith Century: स्मिथने भारताला शतकी दणका देत एक-दोन नाही तब्बल 5 मोठ्या विक्रमांना घातलीये गवसणी, एकदा पाहाच

स्मिथचा विश्वविक्रम

स्मिथने हे 32 वे कसोटी शतक 99 व्या कसोटी सामन्यांमधील 174 व्या डावात खेळताना केले आहे. त्यामुळे तो सर्वात जलद 32 कसोटी शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने याबाबतीत रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

रिकी पाँटिंगने 176 कसोटी डावात 32 कसोटी शतके केली होती. तसेच सचिन तेंडुलकरने 179 डावात 32 वे कसोटी शतक झळकावले होते.

  • सर्वात जलद 32 कसोटी शतके करणारे खेळाडू

    • 174 डाव - स्टीव्ह स्मिथ

    • 176 डाव - रिकी पाँटिंग

    • 179 डाव - सचिन तेंडुलकर

    • 193 डाव - युनूस खान

    • 195 डाव - सुनील गावसकर

स्मिथची स्टीव वॉ यांच्या विक्रमाशी बरोबरी

स्मिथचे हे 32 वे कसोटी शतक केल्याने आता तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने या यादीत दिग्गज फलंदाज स्टीव वॉ यांची बरोबरी केली आहे. वॉ यांनी देखील 32 कसोटी शतके केली आहेत. सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये सध्या रिकी पाँटिंग अव्वल क्रमांकावर आहे. पाँटिंगने 41 शतके केली आहेत.

  • सर्वाधिक शतके करणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू (29 जून 2023 पर्यंत)

    • 41 शतके - रिकी पाँटिंग (287 डाव)

    • 32 शतके - स्टीव्ह स्मिथ (174 डाव)

    • 32 शतके - स्टीव्ह वॉ (260 डाव)

    • 31 शतके - मॅथ्यू हेडन (184 डाव)

    • 29 शतके - डॉन ब्रॅडमन (80 डाव)

Steve Smith
Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, कसोटीत 9000 धावा पूर्ण करणारा ठरला जगातील दुसरा फलंदाज

ऍशेसमध्ये चौथा क्रमांक

स्मिथने ऍशस मालिकेमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता स्टीव्ह वॉ यांना मागे टाकले आहे. स्मिथ आता या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या 29 जून 2023 पर्यंत ऍशेसमध्ये 34 सामन्यामध्ये 3176 धावा झाल्या आहेत.

त्यामुळे त्याने स्टीव्ह वॉ यांच्या 3173 ऍशेस धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. आता या यादीत त्याच्यापुढे केवळ डॉन ब्रॅडमन (5028), जॅक हॉब्स (3636) आणि ऍलन बॉर्डर (3222) हे तीन फलंदाज आहेत.

रोहितला टाकले मागे

स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 44 वे शतक असल्याने तो आता सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने रोहित शर्माच्या 43 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या यादीत 75 शतकांसह विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे, तर 46 शतकांसह जो रुट दुसऱ्या आणि 45 शतकांसह डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्मिथने 9 हजार धावाही पूर्ण केल्या

दरम्यान स्मिथने या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे तो कुमार संगकारानंतर सर्वात जलद 9 हजार कसोटी धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

त्याने 174 डावात 9 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत, तर संगकाराने 172 कसोटी डावात 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावाही पूर्ण केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com