Ashes 2023 Video: पाऊस-वारा नाही, तर आंदोलकांमुळे लॉर्ड्स कसोटीत अडथळा, बेअरस्टोने तर एकाला...

लॉर्ड्स कसोटीच्या सुरुवातीलाच आंदोलकांमुळे अडथळा आला होता, तेव्हा बेअरस्टोचे रौद्र रुप पाहायला मिळाले.
Lords Test
Lords TestDainik Gomantak
Published on
Updated on

Two Protesters disrupt Lord's Ashes 2023 Test: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना बुधवारपासून (28 जून) सुरू झाला आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होत आहे. पण हा सामना सुरु झाल्यानंतर लगेचच दोन आंदोलनकर्त्या व्यक्तींमुळे अडथळा आला होता.

सध्या इंग्लंडमध्ये जस्ट स्टॉप ऑईलकडून आंदोलने केली जात आहेत. ब्रिटीश सरकारने नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांसाठी सर्व परवाने रद्द करावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

याच आंदोलनातील दोन व्यक्तींनी दुसरा कसोटी सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्या षटकापूर्वी मैदानात प्रवेश केला होता. त्यांनी त्यांच्याबरोबर केशरी रंगाची पेंट पावडरही आणली होती. त्यांच्यामुळे या सामन्यात अडथळा आला. पण खेळाडू आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना खेळपट्टी खराब करण्यापासून रोखले.

Lords Test
Ashes History: '...आणि इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला', गोष्ट 141 वर्षांपूर्वीच्या 'त्या' पराभवाच्या बदल्याची

हे दोन आंदोलनकर्ते जेव्हा मैदानात आले, तेव्हा त्यातील एकाला इंग्लंडचा यष्टीरक्षरक जॉनी बेअरस्टोने पकडले आणि त्याने त्याला मैदानाबाहेर नेले, त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले.

तसेच दुसऱ्या आंदोलनकर्त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने खेळपट्टीवर जाण्यापासून रोखले. त्यानंतर लगेचच सुरक्षारक्षकांनी येऊन त्याला पकडले. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत

या घटनेदरम्यान काही मिनिटांसाठी खेळ थांबला होता. तसेच बेअरस्टोलाही त्याची जर्सी बदलून नवीन जर्सी घालून यावी लागली. तसेच ग्राउंड्सस्टाफने पेंट पावडरही मैदानातील काढून टाकली.

इएसपीएन क्रिकोइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार जस्ट स्टॉप ऑईलकडून सांगण्यात आले आहे की 'क्रिकेट हा आमच्या राष्ट्रीय वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण क्रिकेट जगत लोकांना राहण्यासाठी अयोग्य होत असताना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा आनंद कसा लुटता येईल? आपण खेळतो ते खेळ, आपण खातो ते अन्न आणि आपण जपत असलेल्या संस्कृतीला धोका असतो, तेव्हा आपले लक्ष विचलित करणे आपल्याला परवडत नाही.'

'क्रिकेट चाहते आणि या परिस्थितीचे गांभीर्य कळणाऱ्या सर्वांनी रस्त्यावर उतरून या बेकायदेशीर, गुन्हेगारी सरकारकडून कारवाईची मागणी करण्याची वेळ आली आहे. जेव्हा आमची मुले आम्हाला विचारतात 'आम्ही काय केले?' हे संकट टाळण्यासाठी, आमच्याकडे चांगले उत्तर आहे.'

Lords Test
Ashes 2023: तब्बल 12 वर्षांनी कांगारुनी कसोटीत केला 'तो' विराट पराक्रम, कमिन्सशी आहे खास कनेक्शन

तसेच लॉर्ड्सची मालकी असलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) मुख्य कार्यकारी गाय लॅव्हेंडर म्हणाले की ते या आंदोलनाचा निषेध करत आहेत. ते म्हणाले, 'त्यांच्या कृतीमुळे केवळ त्यांना आणि मैदानात काम करणाऱ्यांनाच धोका पोहोचवत नाहीयेत, तर फक्त लॉर्ड्सवर नाही, तर देशभर पैसे देऊन खेळ पाहायला येणाऱ्या लोकांकडेही सातत्याने दुर्लक्ष करत आहेत.'

दरम्यान जस्ट स्टॉप ऑईलकडून खेळात अडचणी आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी गेल्या 18 महिन्यात प्रीमियर लीग फुटबॉल सामने, रग्बी युनियन प्रिमियरशीप आणि वर्ल्ड स्नुकर चॅम्पियनशीप या स्पर्धांमध्येही अडथळे आणले होते.

तसेच आंदोलकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड क्रिकेट संघाच्या बसलाही थांबवून ठेवले होते. इंग्लंड आणि आयर्लंड संघात जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉर्ड्सवर एकमेव कसोटी सामना झाला होता.

यावेळी इंग्लंड संघाच्या बसला स्टेडियमवर जात असताना रस्त्यात आंदोलन सुरू असल्याने उशीर झाला होता. याबद्दल जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला होता.

Lords Test
Ashes Series, Tammy Beaumont: टॅमी बोमोंटने रचला इतिहास, इंग्लंडसाठी केला मोठा कारनामा

याच गोष्टी लक्षात घेऊन जेव्हा द ओव्हलवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता, तेव्हा दुसरी पर्यायी खेळपट्टीही तयार करून ठेवण्यात आली होती.

नंतर पावसामुळे थांबला होता सामना

दरम्यान, आंदोलकांना बाहेर नेल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला होता. मात्र 9 व्या षटकानंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर सामना थांबला होता. पण काहीवेळातच पाऊस थांबल्याने सामना पुन्हा सुरू झाला.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा फलंदाजीला उतरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com