Importance Of Immunotherapy in Cancer Treatment
कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे, ज्यावर वेळेवर उपचार घेणे गरजेचे असते. कारण बऱ्याचदा कर्करोगाची लक्षणे शरीरात दिसतात पण ती व्यक्तीला उशिरा समजतात, त्यामुळे उपचार उशिरा सुरु होतात. कर्करोग अनेक प्रकारचा असू शकतो.
कर्करोगाचा उपचार घेत असताना रुग्ण वेगवेगळ्या उपचारांच्या मदतीने बरा होतो. जसे की, शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी ही कर्करोगावरील एक नवीन उपचार पद्धती आहे, जी कर्करोगाच्या उपचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे. पण कर्करोगाच्या रुग्णांसाठी इम्युनोथेरपी खरोखरच फायदेशीर आहे का? चला तर मग तज्ञांकडून जाणून घेऊया...
डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, कर्करोगाच्या (Cancer) उपचारात इम्युनोथेरपी महत्त्वाची ठरत आहे. कारण ती केवळ कर्करोगाला मारतच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना बळकट बनवते. त्या पेशींचे बळकटीकरण कर्करोगाला हारवण्यात खूप मदत करते. तसेच, इतर उपचारांच्या तुलनेत ही थेरपी कर्करोग रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरते. इम्युनोथेरपी प्रामुख्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. या थेरपीचा निरोगी पेशींवर कोणताही परिणाम होत नाही. इम्युनोथेरपीमुळे रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळ मजबूत राहते. ही थेरपी आयुर्मान वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
इम्युनोथेरपी ही कर्करोगाच्या उपचारातील एक नवीन पद्धत आहे. ही थेरपी कर्करोग आणि इतर आजारांशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामध्ये विविध प्रकारची औषधे आणि उपचारांचा समावेश आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करुन कर्करोगाच्या पेशी ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत करतात.
तज्ञांच्या मते, ही थेरपी कर्करोगावर थेट हल्लाच करत नाहीतर तिच्या मदतीने शरीराच्या पेशी विकसित होतात. इम्युनोथेरपीमध्ये शरीराच्या पेशी इतक्या मजबूत बनतात की त्या कर्करोगाच्या पेशी आपोआप नष्ट करतात. प्रत्येक सामान्य पेशी इतकी मजबूत बनवली जाते की कोणत्याही रुग्णाचे शरीर स्वतःहून कर्करोगाचा नाश करु शकते. डॉक्टरांच्या मते, ही थेरपी अधिक प्रभावी, शक्तिशाली आणि कार्यक्षम आहे. इतर उपचारांच्या तुलनेत या थेरपीचे दुष्परिणाम कमी आहेत.
इम्युनोथेरपीमुळे फक्त कर्करोगाच्या पेशींवरच हल्ला होतो, म्हणजेच उर्वरित पेशी सुरक्षित राहतात.
इतर थेरपीपेक्षा कमी दुष्परिणाम.
लॉन्ग टर्म इम्यूनिटी.
कर्करोगाच्या पेशी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता कमी करणे.
वृद्ध कर्करोग रुग्णांसाठी (Patients) अधिक फायदेशीर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.