गोमंतक ऑनलाईन टीम
जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने यासंदर्भात एक इशारा दिला आहे.
योग्य काळजी न घेतल्यास 2050 पर्यंत स्तनाच्या कर्करोगाचे 32 लाख नवीन रुग्ण आढळतील.
याचा अर्थ, दर 20 पैकी एक महिला या कॅन्सरची शिकार होईल. त्यापैकी 11 लाख महिलांचा मृत्यू होऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोग वाढण्याची कारणे वाढलेली लोकसंख्या, वाढते शहरीकरण, उशीरा आई होणे.
तसेच, खाण्याच्या चुकीच्या सवयी, सिगारेट-दारू सेवन, व्यायम न करणे आणि लठ्ठपणा अशी कारणे आहेत.
याला उपाय म्हणून संतुलित आहार घेणे, हंगामी भाज्या, ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच, दारु, सिगारेटचे सेवन न करणे, व्यायम आणि योगासन करणे व लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला दिला जातो.