Revolutionary Goans Protest At Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: कामुर्लीतील मेगा प्रकल्पाविरोधात ‘आरजी'ची कडक भूमिका

म्हापसा ‘टीसीपी’वर ‘आरजी’चा मोर्चा; वातावरण तंग

दैनिक गोमन्तक

Revolutionary Goan Protest At Mapusa: कामुर्ली येथील रहिवासी मेगा प्रकल्पास टीसीपीने परवानगी दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.८) रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने म्हापशातील नगर नियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर धडक मोर्चा दिला.

तसेच अधिकारी वर्गाकडून दिलेल्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याने मोर्चेकरांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वातावरण तंग झाले. यावेळी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून म्हापसा पोलिस घटनास्थळी लक्ष ठेवून होते.

दरम्यान, उपनगर नियोजक जयदेव हळदणकर हे कार्यालयात नसल्याने, त्यांच्याऐवजी नियोजन साहाय्यक आरजीच्या सदस्यांना भेटण्यास आले. परंतु, आरजीने प्रश्नांचा भडिमार करताच या अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

त्यामुळे आरजी कार्यकर्ते आणखी खवळले व जोवर आम्हाला या मेगा प्रकल्पाविरोधात कारवाईचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, असा पवित्रा घेत मोर्चेकर सायंकाळपर्यंत प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून बसले.

कामुर्ली येथील सर्व्हे क्र. १७२/१-एन मध्ये हा कथित रहिवासी मेगा प्रकल्प उभा राहतोय. या प्रकल्पस्थळी अडीच मीटर रस्ता आहे. मात्र, स्थानिक अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे परब म्हणाले.

"याच विषयावरून आम्ही ‘टीसीपी’ मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेतली होती. तेव्हा मंत्र्यांनी आमच्या समक्ष जयदेव हळदणकरांना फोन करून ‘आरजी’ची गाऱ्हाणी ऐकून त्यावर कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु हळदणकर हे मंत्र्यांनाही घाबरत नाहीत व मंत्र्यांच्या आदेशास त्यांनी चक्क केराची टोपली दाखवली."

- मनोज परब, अध्यक्ष ‘आरजी’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT