Bjp Spokesperson Giriraj Pai Vernekar Comment On Udayanidhi Stalin Statement: उदयनिधी स्टॅलीन यांचे वक्तव्य हे हिंदूविरोधी मोठ्या कटाचा एक भाग आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, सनातन धर्माविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. राजकीय लाभासाठी हिंदू समुदायावर हल्ला करणे हे आता नित्याचे झाले आहे. हिंदूविरोधी कटाचा तो एक हिस्सा असतो.
मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीच्या एका दिवसानंतर स्टलिन यांनी सनातन धर्मावर आघात केला. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा सुटा असा विचार करता येणार नाही. सनातन धर्माची पीछेहाट होण्यासाठी बैठक आयोजित करणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
त्यानंतर सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना केली. ते कमी पडले की काय म्हणून टू-जी घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून नाव पुढे आलेल्या ए. राजा याने तर सनातन धर्माची तुलना एड्स व महारोगाशी केली. हा हिंदू धर्मावर ठरवून केलेला हल्ला आहे.
वेर्णेकर पुढे म्हणाले, या विषयावर काँग्रेसने चुप्पी साधली आहे. सनातन धर्म सत्य बोला हे शिकवतो. वाईट, चुकीचे काम करू नका. जीव गेला तरी चांगले काम करणे सोडू नका.
काँग्रेसची नवी आघाडी या तत्त्वांच्या विरोधात आहे का? त्यांना खरोखरच शांतता हवी आहे का? हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसनेच कोणाचेतरी तृष्टीकरण करण्यासाठी जन्माला घातला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.