Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: जी-20 समेटपूर्वी राज्यात पर्यटन कन्व्हेन्शन सेंटर

पर्यटन खात्याच्या वतीने उभारण्यात येत असलेले कन्व्हेन्शन सेंटर एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचा सरकारचा निश्‍चय आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असणाऱ्या आपल्या राज्यात उच्च दर्जाच्या पर्यटन साधन सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटन खात्याच्या वतीने उभारण्यात येत असलेले कन्व्हेन्शन सेंटर एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचा सरकारचा निश्‍चय आहे. याच ठिकाणी राज्यात होत असलेल्या जी -20 च्या बैठका घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

 पर्यटन खाते आणि मे. सोअरिंग एरोस्पेस प्रा. लि.ने आज राज्यात हेलिकॉप्टर-पर्यटन सेवा सुरू केली. दावजी-एला, जुने गोवा येथील हेलिपॅडवर ही सेवा सुरू केली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार राजेश फळदेसाई, पर्यटन सचिव संजीव अहुजा, पर्यटन संचालक निखिल देसाई, ब्रिजेश मणेरकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक ओल्ड गोव्याच्या सरपंच सॅनड्रा गोंसालवीस, कंपनीचे धृव शर्मा,अभिनव आणि ममता शर्मा उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, की दर्जेदार पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकार नेहमीच नवनवीन मार्गांचा शोध घेत आहे. उच्च श्रेणीतील पर्यटन सेवा उत्तम प्रकारे पुरवण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) हाच चांगला पर्याय आहे.

हेलिकॉप्टर-सेवा हे या संकल्पनेचे उत्तम उदाहरण आणि राज्यात व्यवसाय सुलभतेचा पावती म्हणता येईल.

आरोग्य,  निरायम पर्यटनावर भर

केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘अमृत काळा’साठी योजलेल्या संकल्पनेनुसार राज्य सरकार आरोग्य,  निरायम पर्यटनावरही भर देत आहे. 

राज्यात मुख्य कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यापूर्वी पर्यटन खात्याच्या वतीने जे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येत आहे ते एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल. यात जी-20 समेटच्या बैठका घेण्याची सरकारची इच्छा आहे,  असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

1364 वरून हवी ती माहिती घ्या

मुख्यमंत्री डॉ. सावंत गोवा पर्यटन विभागाच्या कॉल सेंटर सुविधेचाही आरंभ केला. या योजनेनुसार 1364 या हेल्पलाइनवर स्थानिक नागरिक आणि पर्यटक कॉल करून त्यांना पर्यटनाच्या संदर्भात जी माहिती हवी आहे, ती मिळवू शकतात.

देशात राज्यात पहिल्यांदाच ही सेवा सुरू करण्यात येत असून याचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

...आणि मुख्यमंत्र्यांनाच मिळाली अर्धवट माहिती

पर्यटन खात्याच्या वतीने हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ करताना 1364 हा पर्यटन ऑनलाईन नंबर लॉन्च केला. पहिला फोन अर्थात मुख्यमंत्र्यांनी लावला आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्टिंग केले. या फोनवर मुख्यमंत्र्यांनी गोव्यात कार्निवल कधी सुरू होत आहे? आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी होत आहे? याची माहिती विचारली.

त्यावेळी संबंधित कॉल सेंटरवरील महिलेने कार्निवल कधीपासून सुरू होत आहे, याची माहिती दिली खरी. मात्र, कोणत्या दिवशी कोणत्या शहरात कार्निवल होत आहे? हे अजून ठरले नाही असे उत्तर दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘ठीक आहे. पर्यटनमंत्र्यांनाच विचारतो’ असे म्हणत विषयाला बगल देत भाषण सुरू ठेवले. मात्र, या संवादाने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT