Amul Milk: केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होऊन त्यावरील चर्चाही संपत नाही तोपर्यंतच अमूलने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. गतवर्षी दोन वेळा दूध दरवाढ करणाऱ्या अमूलने वर्षाच्या सुरवातीलाच प्रति लिटर तीन रुपयांने दर वाढविले आहेत.
यामुळे अमूलच्या इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरावरही परिणाम होणार आहे. नुकतीच गोवा डेअरीनेही आपल्या दुधाचे दर वाढविल्याने ग्राहकांत नाराजी होती, आता अमूलच्या दरवाढीने त्यात आणखी भर पडली आहे.
अलीकडच्या काळात गाईला होणाऱ्या लम्पी आजाराचा दूध उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे.
त्यामुळे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कंपन्यांना अधिक भाव देऊन दूध खरेदी करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच तीन रुपये प्रतिलिटर दूध दर वाढवून अमूलने ग्राहकांची चिंता वाढविली आहे.
राज्यात दररोज 4.5 लाख लिटर दूध लागते. ही मागणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील दूध संघ पूर्ण करतात. त्यात गोवा डेअरीची अर्धी मागणी महाराष्ट्रातील दूध संघ पूर्ण करतात.
गोवा डेअरीच्या दुधाची दररोजची मागणी साधारण राज्यात 45 हजार लिटर आहे. गोव्यातील शेतकरी गोवा डेअरी आणि अमूलची गोव्यातील कंपनीला दूध पुरवठा करतात.
गोवा डेअरीनेही काही आठवड्यांपूर्वीच दर वाढविल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे. दूध संघाला लिटरमागे पाच रुपयांपर्यंत वाढ करावी लागले आहे.
राज्यात सर्वाधिक दूध विक्री ‘वारणा’ची
राज्यात सर्वात जास्त वारणा दुधाची विक्री होते. मध्यंतरी वारणा दूध संघाने दर वाढविल्यानंतर त्याचा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे साधारण राज्यात दररोज वारणाचे साडे तीन लाख लिटर दुधाची विक्री होते.
त्याच्याखालोखाल अमूलचे 1 लाखाच्या आसपास, तर गोवा डेअरीचे 60 हजार लिटर दूध राज्यात दररोज विक्री होते. त्याशिवाय कर्नाटकातून येणारे नंदिनी 40 हजार, तर आरोक्य सुमारे 20 हजार लिटरच्या आसपास दूध विक्री होते, अशी माहिती मुख्य वितरक मुन्नालाल हलवाई यांनी दिली. यात काही आकडेवारी कमी जास्तही असू शकते, असेही ते म्हणाले.
गोवा डेअरीनेही दिला होता धक्का : पंधरवड्यापूर्वीच 21 जानेवारीपासून गोवा डेअरीच्या दूध दरात अचानक मोठी वाढ केली होती. प्रतिलिटर दुधामागे चार रुपयांची वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.