Goa News : गोव्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने 2023 या वर्षात काही ठरावीक दिवसांसाठी रात्री 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा दिली आहे. मात्र, परवानगी देताना विभागाने यावर काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.
संगीत वाजवण्यास 21 फेब्रुवारीला कार्निवलच्या पार्श्वभूमीवर कार्निवलच्या शेवटच्या दिवसासाठी संपूर्ण गोवा राज्यात, 9 एप्रिलला इस्टर पूर्वसंध्येला, गणेश चतुर्थी (मूर्ती विसर्जनाचा दुसरा दिवस आणि मूर्ती विसर्जनाचा पाचवा दिवस) 20 आणि 23 सप्टेंबर रोजी, नवरात्री (नवरात्रीचा शेवटचा दिवस) 23 ऑक्टोबरला, 11 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, नाताळ ते नववर्षापर्यंत सलग 8 दिवस मुभा देण्यात आली आहे तर यामध्ये इस्टर, नवरात्री आणि दिवाळीतील प्रत्येकी 1 दिवस कमी करण्यात आला आहे.
24 ते 31 डिसेंबर पर्यंत म्हणजेच ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ते नवीन वर्षाची संध्याकाळ अशी सलग 8 दिवस रात्री 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा दिली आहे.
परवानगी जारी करताना काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. संबंधित राज्यातील ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद किंवा राज्यातील एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट अर्जाच्या प्रतिसादातकेवळ केस-टू-केस आधारावरच संगीत वाजवण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम 2000 मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जावे तसेच संबंधित 'अधिकारी' परवानगी दिलेल्या ठिकाणी आवाजाच्या पातळीचे निरीक्षण करतील आणि उल्लंघन झाल्यास तत्काळ उपाययोजना करतील अशा अटी तसेच शर्ती घालण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.