पर्वरी : बेती येथील नदी परिवहन खात्याच्या सर्व्हे नं. 68/0 जमिनीत इंडस कंपनीमार्फत बांधल्या गेलेल्या टॉवरला ग्रामस्थांचा विरोध असून आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचे पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी सांगितले. तर सरकारी नोकर असल्याने सरकारी आदेशाचे पालन करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रम राजे भोसले यांनी सांगितले.
नदी परिवहन खात्याच्या जमिनीत टॉवर बांधला गेल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच, हा टॉवर आरोग्यास हानिकारक असल्याने ग्रामस्थांनी पंचायतीकडे धाव घेतली. सरपंचांचा वॉर्ड असल्याने सरपंच स्वतः ग्रामस्थांबरोबर या लढ्यात उतरले. पंचायतीत तक्रार नोंदवताच इन्स्पेक्शन करण्यात आले व इन्स्पेक्शनचा रिपोर्ट संबंधित अधिकाऱ्यांना पंचायत संचालक, गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.
या पंचायतीत 29 जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव क्र. 3 नुसार आनंद गावकर या ग्रामस्थाने मांडलेल्या ठरावानुसार पंचायत क्षेत्रात मोबाईल टॉवर नको असून, त्यास विरोध करण्याचे ठरविले गेले. सरपंच चोडणकर यांनी त्या ठरावास अनुमोदन दिले. ग्रामस्थांचा विरोध असल्यास कोणत्याही परिस्थितीत हा टॉवर पूर्ण करू देणार नाही, असे ते म्हणाले.
आमदार-मंत्र्यांना तक्रारीच्या प्रती
ग्रामस्थांच्या तक्रारीस अनुसरून पंचायतीमार्फत नदी परिवहन खात्याच्या व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पंचायतीकडून हा टॉवर हटविण्यास व परवानगी दिल्यास तो रद्द करण्याची नोटीस 4 रोजी पाठविली गेली. त्याच्या प्रती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार रोहन खंवटे व सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अभियंता यांना पाठविण्यात आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.