Shukra Gochar 2026: शुक्र ग्रह प्रसन्न होणार! 'या' 5 राशींना मोठ्या लाभाचे संकेत; काय होणार महत्वाचे बदल? वाचा..

Venus Transit 2026: २६ मार्च, गुरुवारी शुक्र ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होणार असून या ग्रहस्थितीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ज्योतिष अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
Shukra Gochar 2026
Shukra Gochar 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

२६ मार्च, गुरुवारी शुक्र ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होणार असून या ग्रहस्थितीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ज्योतिष अभ्यासक व्यक्त करीत आहेत. मेष ही मंगळाची रास मानली जाते आणि शुक्र-मंगळ यांचे संबंध अनुकूल मानले जात असल्याने या बदलामुळे मेष, मिथुन, सिंह, तुला आणि धनु या पाच राशींना विशेष लाभ मिळू शकतो. सौंदर्य, प्रेम, संपन्नता आणि सुखसोयी यांचे प्रतिनिधित्व करणारा शुक्र ग्रह जीवनात आनंद, प्रगती आणि नवे संधीचे मार्ग निर्माण करतो, असे मानले जाते.

मेष:
या राशीमध्ये शुक्राचा प्रवेश प्रथम स्थानात होणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण आणि सर्जनशील विचारांमुळे कौतुक मिळू शकते. वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे वातावरण राहण्याचे संकेत आहेत. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.

मिथुन:
मिथुन राशीसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. मित्रपरिवार आणि सामाजिक संबंध वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही काही नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. सहकाऱ्यांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल.

सिंह:

सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकते. शिक्षण किंवा दूरच्या प्रवासाशी संबंधित योजना पुढे सरकू शकतात. जुन्या गुंतवणुकीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Shukra Gochar 2026
Rashi Bhavishya: पैसा खुळखुळणार! 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, बाकीच्यांचे काय? वाचा संपूर्ण राशिभविष्य..

तूळ:

तुळ राशीसाठी हा काळ सुखसोयी वाढविणारा ठरू शकतो. वैवाहिक जीवनात सौहार्द वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवे काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही सुधारणा दिसून येऊ शकते.

Shukra Gochar 2026
Rashi Bhavishya: प्रेरणादायी दिवस! 'या' राशींचे बदलणार दिवस; वाचा संपूर्ण राशीभविष्य

धनु:

धनु राशीच्या व्यक्तींना कुटुंबातून आनंदाची बातमी मिळू शकते. शिक्षण, सर्जनशील कामे आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगतीची संधी मिळेल. काही अडथळे दूर होऊन कामांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com