Mobile Tower: शिवोलीत मोबाईल टॉवरचे काम पाचव्‍यांदा पाडले 'बंद'

Siolim: ग्रामस्थांनी टॉवरच्या बांधकामाला हरकत घेत बांधकाम बंद पाडले.
Goa Mobile Tower
Goa Mobile TowerDainik Gomantak

Goa: शिवोली येथील आरोग्यकेंद्राच्या आवारात इंडस कंपनीकडून उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरचे बांधकाम काल सोमवारी सायंकाळी मार्ना-शिवोली पंचायत मंडळ तसेच ग्रामस्थांनी तब्‍बल पाचव्‍यांदा बंद पाडले. यावेळी म्हापसा मामलेदार दशरथ गावस, कंपनीचे अधिकारी, कंत्राटदार आणि हणजूण पोलिस उपस्थित होते.

सहा ते सात महिन्यांपूर्वी इंडस कंपनीकडून सर्वप्रथम चिवार-हणजूण येथील प्राथमिक शाळेच्या आवारात मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तेथील ग्रामस्थांनी टॉवरच्या बांधकामाला हरकत घेत बांधकाम बंद पाडले होते.

Goa Mobile Tower
Water Bill Hike in Goa : पाणी दरवाढीवर सरकार ठाम

दरम्यान, त्‍यानंतर कंपनीकडून तोच टॉवर सडये-शिवोलीतील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यासाठी रातोरात खड्डे खणण्यात आले.परंतु सडयेतील ग्रामस्थांनी प्रखर विरोध करीत हा प्रयोगही हाणून पाडला.

सरतेशेवटी कंपनीकडून त्याच टॉवरचे बांधकाम शिवोली आरोग्यकेंद्राच्या आवारात उभारण्यासाठी गेले तीन महिने प्रयत्न चालविले होते. परंतु प्रत्येक वेळी त्यांना स्थानिक लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्‍यामुळे काम बंद होते.

Goa Mobile Tower
Pandurang Raut अनंतात विलीन; डिचोलीचा 'विकासपुरुष' हरपला!

अखेर घेतला काढता पाय

काल दुपारी पुन्हा एकदा कंपनीचे अधिकारी, मोबाईल टॉवरचे कंत्राटदार तसेच म्हापशाचे मामलेदार पोलिस फौजफाट्यासह येथील आरोग्यकेंद्राच्या आवारात जमा झाले. यावेळी ग्रामस्‍थांनी टॉवरच्या बांधकामाला तीव्र विरोध केला व संबंधित अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. मामलेदार गावस यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता तो विफल ठरला. त्‍यामुळे त्‍यांना काढता पाय घ्‍यावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com